चिक्केवाडी या दुर्गम वस्तीची जाणून घेतलेली दुर्दशा..

'चिक्केवाडीला विकासाची वाट कधी मिळणार..?' भुदरगड तालुक्यातील गारगोटी या मुख्य ठिकाणापासून पाटगाव हे ३५ किलोमीटर अंतरावरचे गांव.१६ व्या शतकात मौनी महाराजांचे या गावी वास्तव्य होते.छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या स्वारीवर जात असताना मौनी महाराजांची या ठिकाणी राजांनी भेट घेतली होती असे हे ऐतिहासिक ठिकाण. दोन महान विभूतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी ही पवित्र भूमी...अजूनही मौनी महारांचा मठ त्या पुण्यभेटीची साक्ष देतो.मावळत्या अंगाला विस्तीर्ण असे पाटगाव धरण...संपूर्ण परिसर जलमय दिसतो.या धरणाच्या पाण्याने चहूबाजूंचा परिसर अगदी सुजलाम सुफलाम झालेलाय.हिरवाईने नटलेला शिवार..सुखासमाधानं नांदणारी देखणीपान घरं. घरासमोर अंगण.असं कोकणरूप ल्यालेलं पाटगाव.या गावापासून साधारण वीस किलोमीटर अंतरावर घनदाट झाडीझुडपांच्या जंगलात वसलेला प्...