"प्रिय वाचकहो, ज्ञानाच्या दीपातून प्रेरणेचा प्रकाश पसरविणाऱ्या या ब्लॉगविश्वात आपले मनःपूर्वक स्वागत! शब्द, विचार आणि अनुभवांच्या सहवासातून जीवन समृद्ध करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आपल्या भेटीने अधिक अर्थपूर्ण ठरेल. शब्दांच्या माध्यमातून माणसं, विचार आणि प्रेरणादायी जीवनप्रवास जपण्याचा प्रयत्न. शिक्षण, समाज आणि संस्कारांच्या विविध पैलूंना समर्पित माझं हे लेखनविश्व. आपण या ब्लॉगवरील लेख अवश्य वाचा व अभिप्राय जरूर कळवा. आपल्या प्रतिसादातूनच नव्या लेखनाला प्रेरणा आणि दिशा मिळत राहील.
शुक्रवार, ३१ जुलै, २०२०
श्री.जनार्दन बोटे यांच्या जीवनकार्याचा आढावा...
शुक्रवार, १७ जुलै, २०२०
जात्यावरच्या ओव्या...किरण चव्हाण.
पहाटेच्या शांत समयी...दिव्याच्या मंद तांबूस उजेडात... जात्यावर दळण दळणारी माय... जात्याची कर्णमधुर घरघर...आणि मायेच्या गोड गळ्यातील मंजुळ ओव्या...नितांत सुंदर.
'जात्यावरच्या ओव्या'
पहिली माझी ओवी गं प्रभू रामचंद्राला |
सीतामाई शोधासाठी वणवण फिरला ||
घेऊनिया वानरसेना सेतू सागरी बांधीला |
माथा टेकवितो बाई ऐशा पतिराजाला ||
पती सत्यवानाचा जीव घेऊन आली गं ||
पत्नीधर्म पाळावा कसा गं बाईन |
पतिव्रता सावित्री जशी गेली होऊन ||
पुण्याईचे फळ आले संत त्यांच्या पोटाला ||
निवृत्ती-ज्ञानेश्वर...सोपान-मुक्ताई |
भक्तिभाव ज्ञान अवघ्या जगाची माऊली ||
चौथे माझे नमन जिजाऊ बाईला |
पुत्र असा घडविला शोभे राजा प्रजेला ||
शूरवीर घेऊन शत्रुसंगे लढून |
शिवबाने बांधले गं स्वराज्याचे तोरण ||
तिच्यामुळे बाई माझ्या लेकीबाळी शिकल्या |थोरमोठ्या जाहल्या नावारूपाला आल्या ||
फुले,शाहू,आंबेडकर समानतेचा मंत्र दिला ||
किती ज्ञानी किती गुणी काय कीर्ती वर्णू मी |
अशा संत,विभूतींनी पावन झाली गं भूमी. ||
देऊनिया बलिदान मुक्त केले देशाला ||
लढले झगडले स्वातंत्र्य मिळाया |
नमस्कार सदा माझा त्यांच्या वीर स्मृतीला ||
- किरण चव्हाण.
गुरुवार, ९ जुलै, २०२०
किरण चव्हाण यांच्याविषयी थोडक्यात......
![]() |
आई बाबा
रा - पांगिरे ता- भुदरगड जि-कोल्हापूर.
नोकरी - सहा.शिक्षक माध्यमिक विद्यालय आर्दाळ.
ता - आजरा, जि-कोल्हापूर.
मोबा - ८८०६७३७५२८.
--------------------------------------------
साहित्य
गुरुवर्य इंद्रजीत देशमुख (काकाजी) व गुरुवर्य श्री.सदानंद पुंडपाळ सर यांच्याहस्ते २५ ऑगस्ट २०१७ ला 'नदीकाठचा संसार ' आणि 'लढा-दोन कर्तृत्ववान मुलींचा' या दोन पुस्तकांचे प्रकाशन.
'साहित्य चळवळ -गांवशिवार साहित्य परिवार गारगोटी या संस्थेचा 'लढा-दोन कर्तृत्ववान मुलींचा' या साहित्यकृतीस विशेष पुरस्कार.'
ग्रामीण कथासंग्रह 'नदीकाठचा संसार आणि बालकादंबरी 'लढा...दोन कर्तृत्ववान मुलींचा' या पुस्तकांची महाराष्ट्र राज्य ग्रंथ समितीच्या शासनमान्य ग्रंथ यादीत निवड.
'मुलांच्या लेखन वाचन विकासातील शिक्षकांची भूमिका: या विषयावर मराठी बालकुमार साहित्य सभा यांच्यावतीने घेण्यात आलेल्या निबंधस्पर्धेत दुसरा क्रमांक.
कॉ. गोविंद पानसरे विचारमंच कोल्हापूर आयोजित सामाजिक कविता- काव्यवाचन स्पर्धा 'लई काय नाही थोडं सांगावसं वाटतं.' या कवितेस द्वितीय क्रमांक. साल - २०१५
कविता सादरीकरणाचा व्हिडीओ पहा खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/PaX6AaZFavQ
कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावरवरून कविता प्रसारित.
'नागोबाच्या नावानं चांगभलं' या ऑडिओ-व्हिडीओ कॅसेटसाठी सहा गाण्यांचे गीतलेखन.
शालेय नाट्यलेखन :
१) माणूस.
२) नुसती धमाल विनोदी नाटक
३) संस्काराचा परिसस्पर्श.
माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या संस्काराचा परिसस्पर्श नाटकातील काही क्षणचित्रे.
२) नागनाथ पाठीराखा.
३) वीर जवान तुझे सलाम.
वृत्तपत्र,मासिक,दिवाळी अंक यातून लेख प्रसिद्ध.
माझे व्यासपीठ - ब्लॉग,फेसबुक, व्हाट्सएपच्या माध्यमातून सातत्यपूर्ण लेखन.
--------------------------------------------------------
'विनाअनुदानितच्या लढ्यातील माझे योगदान.' विनाअनुदानित प्रश्नांवर लेखनाच्या माध्यमातून सातत्याने प्रकाशझोत.
'मोदीजी क्या आप हमे न्याय दे सकते हैं' या मथळ्याखाली हिंदीतून लिहिलेले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पाठवलेल्या पत्राची ध्वनिफिती ऐका खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/unyWQ1NwwuA
मा.मुख्यमंत्री/मा.शिक्षणमंत्री यांच्याकडे पत्रातून विनाअनुदानितची मांडली व्यथा.
राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांची पगाराविना झालेली फरफट त्यांची मांडलेली व्यथा याची दखल महाराष्ट्र टाईम्सने घेतली दखल...दि.२०/११/१८
महाराष्ट्र टाईम्स बातमी.
माझ्या 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकाच्या अनुषंगाने विनाअनुदानित प्रश्नांसंदर्भात शिक्षक आमदार दत्ता सावंत यांच्याशी प्रत्यक्ष मुलाखत.तसेच शिक्षक आमदार विक्रम काळे व ना.गो.गाणार यांच्याशी दूरध्वनीवरून मुलाखत.
शिक्षण क्षेत्रातील माझे मार्गदर्शक गुरू आणि विनाअनुदानित पुस्तकाच्या वाटचालीतील मार्गदर्शक शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत हेरंब कुलकर्णी सर.
२) ग्रामीण कथासंग्रह.
३) प्रवास ध्येयवेड्यांचा.
४) कादंबरी 'शानु'
आवड : चित्रकला, संगीत,शेतीकाम.
चित्रकला :
संगीत :
"जसा लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावा आणि त्याचं सोनं व्हावं तसा गुरूमाऊलींचा स्पर्श जीवनाला झाला नि माझ्याही जीवनाचे सोने झाले....जीवनार्थ कळाला...धन्य हो गुरुदेवा...जय हो..मंगल हो."
'अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्हीं लोक...'
'साधू संत येति घरा तोचि दिवाळी दसरा...माझे गुरुदेव माझ्या घरी आले तो आमच्या भाग्याचा क्षण'
माय- भू सेवा शिबिरांतर्गत गुरुवर्य इंद्रजीत देशमुख (काकाजी) सोबत शिंदी खुर्द तालुका-मान जि- सातारा या दुष्काळग्रस्त गावात श्रमदान शिबिरात सहभाग.
पांगिरे गावची पूरग्रस्त माहेरवाशीण सौ.उर्मिला पाटील यांना मदतीसाठी लेखनातून आवाहन करून बेळगुंदी येथे जाऊन जीवनाश्यक वस्तूंची मदत.
शैक्षणिक व्यासपीठच्या माध्यमातून गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.
भुदरगड तालुक्यातील आपाचीवाडी या दुर्गम वस्तीतील कु.राधिका गुरव इ ४ थी व गरीब मुलीला समाजात लेखनाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करून शैक्षणिक साहित्यासह जीवनावश्यक वस्तुंची मदत.
व्हिडीओ पहा खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/Sa19f--CMGU
भुदरगड तालुक्यातील पाल या गावी राहत असलेली सौ.मंगला गुरव व त्यांचा अपंग मुलगा कृष्णात गुरव यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या मदतीसाठी लेखनाच्या माध्यमातून आवाहन.
https://youtu.be/x8_NCrk05dA
नसीमा हुरजूक यांनी लेख वाचून अपंग कृष्णात गुरव याची दखल घेऊन त्याचे अपंग पुनर्वसन केंद्र येथे रवानगी केली.. आज कृष्णात सिंधुदुर्ग येथील अपंग पुनर्वसन संस्थेत कामाला आहे.
पांगिरे गावातील निराधार श्रीमती बायक्का पाटील यांची जबाबदारी घेऊन चंद्रमोळी झोपडीत शिवम परिवार पांगिरे या सामाजिक संस्थेची अनोख्या पद्धतीने स्थापनेची संकल्पना.
![]() |
| शिवम परिवार पांगिरे. |
ज्ञानसंवाद सार्वजनिक वाचनालय वेळूक, ता.मुरबाड, जि. ठाणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त.
विषय - 'कोरोना,माध्यमे व मी.'
जय हो ! मंगल हो!!
मातीशी नाळ जपणारा, उपेक्षितांच्या जगण्याला शब्द देणारा अस्सल ग्रामीण साहित्यिक! डॉ. राजन गवस | जन्मदिन विशेष
कथामय मराठी कथा प्रस्तुत मातीशी नाळ जपणारा, उपेक्षितांच्या जगण्याला शब्द देणारा अस्सल ग्रामीण साहित्यिक! साहित्यि...
-
'सर्वगुणसंपन्न सर्वांगसुंदर व्यक्तिमत्त्व : आदरणीय गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी.' ...
-
कथामय मराठी कथा प्रस्तुत मातीशी नाळ जपणारा, उपेक्षितांच्या जगण्याला शब्द देणारा अस्सल ग्रामीण साहित्यिक! साहित्यि...
-
'एक वेध परीट समाजाचा : भूतकाळापासून वर्तमानकाळपर्यंतचा.' गावगाड्यातील बारा बलुतेदारांपै...





















































































































