पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्री. अशोक चव्हाण यांचा डाक विभागाकडून सन्मान.

इमेज
                डाक सेवेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री.अशोक राजाराम चव्हाण यांचा डाक विभागाकडून उचित सन्मान.                    केंद्र सरकारच्या डाक विभागामध्ये 1991 पासून गेली 30 वर्षे कार्यरत असणारे व कर्तव्यनिष्ठ राहून प्रामाणिकपणे पोस्ट सेवा बजावणारे शांत,संयमी आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व,पांगिरे गावचे सुपुत्र आणि आमचे दादाश्री श्री. अशोक राजाराम चव्हाण यांना डाक विभागातल्या उत्कृष्ठ सेवा कामगिरीबद्दल 'Best Employee Of the year' या पुरस्काराने मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. सध्या ते पोस्ट मास्तर या पदावर कार्यरत आहेत.आपल्या सेवेला वाहून घेऊन एकनिष्ठपणे शांततेने आपले कार्य करीत राहणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे.खरं तर आपल्या कामाशी एकरूप राहून तन्मयतेने काम करण्याचा एक आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. अशा उल्लेखनीय सेवा कार्याची दखल घेऊन त्यांचा झालेला सन्मान हा उचित असा आहेच, त्याचसोबत  सर्वांसाठी आदर्शवत असणारा व प्रेरणादायी ठरणारा आहे.आपल्या सर्वांच्यासाठी ही आनंदा...

विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तकाच्या अनुषंगाने...

इमेज
 विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तकाच्या अनुषंगाने...                           आजच्या शिक्षणक्षेत्रातील विदारक सत्य असलेल्या  विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षावर आधारित 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दि.२१ ऑक्टोबर २०२१ रोजी शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते पुणे शिक्षक मतदार संघाचे विद्यमान शिक्षक आमदार जयंत आसगावर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पार पडला.                           आजच्या शिक्षणक्षेत्रातील विदारक सत्य असलेल्या 'विनाअनुदानित' ह्या ज्वलंत विषयावर आणि २० वर्षांपासून हक्काच्या अनुदानासाठी लढणाऱ्या,झगडणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षावर आधारित 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकाच्या अनुषंगाने हा शब्दप्रपंच. खरं तर मी जरी एक विनाअनुदानित शिक्षक असलो तरी जेंव्हा एक माणूस म्हणून मी या प्रश्नाकडे पाहतो. त्यावेळीे मला प्रकर्षाने जाणवतं की, 'विनाअनुदानितचा संघर्ष हा एका विनाअनुदानित शिक्षकाचा संघ...