पोस्ट्स

जून, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

'आयुष्याच्या संध्याकाळी हवाय एक निवारा... मायेचा उबारा...समाधानाचा किनारा.'

इमेज
'आयुष्याच्या संध्याकाळी हवाय एक निवारा... मायेचा उबारा..समाधानाचा किनारा.'   "पांडुरंगा...दुख सांगायचं तर कुणाला सांगायचं...म्या तुझा माळकरी.२२ वरसं झाली  तुझी माळ गळ्यात हाय.नेमानं  तुझ्या पंढरीची वारी करतू…म्या पंढरीचा वारकरी.. "संसार पंढरी आम्हीं वारकरी... आगा पांडुरंगा सुखी ठेव सारी.." असा अभंगाचा सूर कधी भजनात आळीवायचो...तुझ्या हरिनामात दंग व्हवून जायाचो...पण तुझ्या पंढरीच्या वाटचा हा वारकरी कधी भिकारी झाला कळालंच न्हाई बघ...कुणाला माझं दुख सांगायचं...आता हाय का माझं तुझ्याबिगार कुणी...? कोण ऐकून घिल माझ्या येड्यागबाळ्याचं...आन ऐकून घ्यायला कुणी जवळ तर यायला पायजे नवं... कोण ईल माझ्याजवळ आता...मी तर एक म्हारोगी..."                         हे आहेत श्री.सदाशिव रावबा सुतार भुदरगड तालुक्यातील हेदवडे हे गांव.वार्धक्याकडे झुकलेलं अंदाजे ८० पर्यंत वय.पत्नीनं अर्ध्यावर साथ सोडली.  पोटाला एक मुलगा.कष्टकरी जीवन...सुतारकाम करण्यात उभी  हयात गेली...टीचभर पोटासाठी आजही उतारवयात कष्ट सुरू...

कविता- पैसा झाला मोठा नाती झाली खोटी....-किरण चव्हाण.

इमेज
'पैसा झाला मोठा नाती झाली खोटी.' पैशापायी माणसाला वळखू येईनात नाती. पैशाच्या मागं मागं सारी दुनिया धावती. आईबाप स्वतःचं स्वस्त झालं की गा याला, पैशानच नाही का याला जलोम दिला. भाऊ-बहीण मग तर काय लांबचीच गोष्ट, दोघच राजाराणी कसं सुखात ऱ्हात्यात मस्त. काय याचा मिजास काय तो तोरा कुणाचीही किंमत नाही, वाटतं याला माझ्यासारखा दुसरा कुणीच नाही. रोजचा हिशोब ठेवत असशील ना? किती पैसा कमावला, फक्त हिशोब नसेल याचा किती किती नाती गमवला. सगळं काही भेटत पैशानं पण एकच भेटत नाही, जीवाला जीव देणारं माणसं पैशानं मिळत नाही. बांधशील माडी वर माडी फिरायला नवी गाडी. सारं इथंच ऱ्हायाचं,तुझ्यासाठी पुरल शेवटी एकच काडी. काय घेऊन आलो नी घेऊन काय जाणार कधी विचार केला? आरं जगजेता सिकंदरही शेवटी हात हालवत गेला. फक्त पैसाच नाही येत,येती मदतीला माणसही, तवा जपतोस जसा पैसा तसं जपायला शिक नातीही.                                       - किरण चव्हाण.

कविता - धरित्रीचा बाळ..---किरण चव्हाण.

इमेज
धरित्रीचा बाळ. माझी धरित्री गं माय ओली बाळंतीण बाय तिच्या कुशीतून कसं अंकुरलं तान्हं बिय... मऊ मऊ लोण्यागत ओल्या मायेचा पदर पिकबाळराजा तिचा पोसतो तिच्या अंगावर कोळ कोळ किती पात इवलासा नाजूक देठ दिस साजिरं गोजिरं कुठं लावू त्याला तिटं सुवासिनीगत बाई झाडवेली गं सजल्या धरित्रीच्या या लेकीबाळी  बाळ पाहुनी नटल्या. गडी राकट रांगडा बाळ मायेचा आधार उभा पाठीशी तो हाय भाऊ पाठचा डोंगर. वारा झुलवतो झुला  खेळवतो बाळराजा सवंगडी वारा करतुया लाडक्याला गुदगुल्या. आली नणंद काठाला नदी धरित्रीला भेटाया आलं तिला गं भरून बाळराजाला बघून  तान्हा पीकबाळ त्याला  किती जपावं जपावं. माया करावी तरी कशी कोडकौतुक करावं. बाप मेघराजा येतो माय-लेकरांची भेट घेतो त्यांचा बाळपिकराजा कसा दिसामासानं वाढतो. ------------------------------------------------------ -किरण चव्हाण. मोबा-८८०६७३७५२८.

प्रयोगशील शेती.

इमेज
प्रयोगशील शेतीमधून आधुनिक पद्धतीने मिळविले जाते भरघोस उत्पादन.                                                   श्री.ज्ञानदेव दशरथ येलकर मूळ गाव-बेगवडे एक धरणग्रस्त... परंतु शासनाकडून पुनर्वसनातून बामणे सरहद्दीत त्यांना ६६ गुंठे जमीन मिळाली.पेशाने प्राथमिक शिक्षक पण त्यांच्यात दडला आहे एक कुशल शेतकरी.आणि त्यांच्यातल्या शेतकऱ्याने अगदी नियोजन पध्दतीने या  जमिनीत नंदनवन साकारले आहे..६६ गुंठ्यापैकी ४५ गुंठ्यांत ऊसाची लागवड केली आहे.आणि उरलेल्या २० गुंठ्याच्या एका सरळ पट्टीमध्ये शतावरी पीक घेण्याच्या उद्देशाने ३ फूट अंतरावर सऱ्या काढल्या आहेत.शतावरी औषधी वनस्पतीच्या पीकाचा कालावधी साधारण दीड वर्षाचा आहे. त्याच्या मुळकांड्या सरासरी २०० रु किलो दराने विकल्या जातात.पण शतावरी पिकाची लागवड करण्याच्या अगोदर त्यांनी वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे २९ जानेवारीला आंतरपीक म्हणून TAG-24 (फुले-२४) हे उन्हाळी भुईमुगाचे पीक घेतले.तीन फूट अंतरावर असलेल्या बोदावर दोन फूट...