श्री.जनार्दन बोटे यांच्या जीवनकार्याचा आढावा...

'बँकिंग क्षेत्रातील ४१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून आदरणीय श्री.जनार्दन बोटे साहेब आज रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला हा आढावा...' कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पांगिरे या छोट्याशा गावी श्री. महादेव जोतिबा बोटे व सोनाबाई उर्फ गयाबाई महादेव बोटे या पुण्याशील दांपत्याच्या पोटी जनार्दन बोटे यांचा १५ जुलै १९६२ रोजी पांगिरे येथे जन्म झाला.एक भाऊ व बहीण अशी ही मिळून तीन भावंडं. वडील मुबंईला गिरणी कामगार म्हणून कामाला.तुटपुंजा पगार.आई गावी शेतमजूरी करायची.घरची हालाखीची परिस्थिती. गरिबी तर पाचवीलाच पुजलेली.जनार्दन बोटे यांचे प्राथमिक शिक्षण पहिली ते तिसरी पर्यंत पांगिरे या गावी झाले.आणि मग त्यानंतर ४ थी इयत्तेपासून मुंबईत शिक्षण सुरू झाले.उपजतच हुशार,चुणचुणीत असलेले बोटे साहेब प्रत्येक इयत्तेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.त्यान...