"शांत, शिस्तप्रिय आणि विद्यार्थिप्रेमी शिक्षक श्री. विनायक पाटील सरांचा सन्मान"

शांत शिस्तप्रिय,मायाळू विद्यार्थीप्रिय गुरू श्री. विनायक पाटील सर.. काही माणसं शांत, संयमी आणि आपल्या नेमून दिलेल्या कार्याकडे प्रामाणिक पणे वाटचाल करणारी असतात. ती बोलकी नसतीलही पण त्यांचे काम मात्र बोलके असते. त्यांच्या मनाची ऊर्जा, एकाग्रता ही त्यांनी सातत्याने आपल्या कामाप्रतिचं व्यतीत केलेली असते. असेच एक शांत, संयमी,मितभाषी व्यक्तिमत्त्व म्हणजे गुरुवर्य विनायक पाटील सर आज ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत. अगदी भर उन्हात स्वतःच सेवानिवृत्त समारंभाची पत्रिका घेऊन सर माझ्या घरी आले.पत्रिका हातात देत आग्रहाचं निमंत्रण दिलं तेंव्हा सहजच माझे हात सरांच्या पायाशी गेले. सरांचे चरणस्पर्श केले. सरांना बसण्याची विनंती केली पण घाईगडबडीत उभ्या उभ्याच सर आमंत्रण देऊन घरातून बाहेर पडले. सर निघून गेले आणि हातात निमंत्रण पत्रिका घेत..न्याहाळू लागलो ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सर सेवानिवृत्त होत आहेत.. त्या ३३ वर्षांच्या कारकिर्दीतील विद्या मंदिर पांगि...