बाप गेला आणि... "बापाची प्रेरणा: अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल"

बाप गेला आणि... आज मी जेंव्हा कधी मुद्दामहून डोळे मिटून, रस्त्याने चालावयाचा प्रयत्न करतो.तेंव्हा दहा पाऊलेही नीट धाडसाने टाकू शकत नाही...मनात भीती वाटते. वाट चुकेल की काय..? मी कुठे भलतीकडेच जाईन का काय..? आणि मग माझे बाबा माझ्या डोळ्यासमोर उभे राहतात..माझा बाबा कसा चालत होता..? माझा बाबा अंधारल्या डोळ्यांनी प्रत्येक पाऊल कसा टाकत होता.? अंधाऱ्या डोळ्यांनी आयुष्याची लढाई लढणारा माझा बाप खरंच माझ्यासाठी जगातला एक ग्रेट माणूस आहे. ज्या बापाच्या पुढची वाट सदा अंधाराची होती, त्या बापानं मी इवलासा असताना माझं बोट धरून मला शाळेत पाठवलं होतं. कारण त्याला माहित होतं, स्वतःचं आयुष्य जरी अंधारान दाटलं असलं तरी पोराच्या आयुष्यात प्रकाश येईल तो शिक्षणामुळचं. बाबाला माहिती होतं की, पाचवीला पूजलेल्या या गरि...