"आजच्या समाजातील स्त्रीचे स्थान: बदलते दृष्टिकोन आणि सशक्तीकरण" तालुकास्तरीय निबंध स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे निबंध लेखन

आजच्या समाजातील 'स्त्री' चे स्थान ? आजच्या समाजातील स्त्रीचे स्थान काय..? या प्रश्नाकडे वळताना आईच्या उदरापासूनचं सुरुवात करावी लागेल.. आईच्या गर्भात खुडणाऱ्या स्त्रीचं स्थान सांगावं की, अंतराळात जाणाऱ्या स्त्रीचं ? उंबरठ्याच्या आत घुटमळलेल्या स्त्रीचं सांगावं की, सातासमुद्रापार गेलेल्या स्त्रीचं स्थान सांगावं..? मणिपूर मध्ये विवस्त्र अवस्थेत नग्न धिंड काढणाऱ्या स्त्रीचं सांगावं की,...देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या नारीच सांगावं... घरात चूल आणि मूल सांभाळणाऱ्या स्त्रीचं सांगावं की, राष्ट्राच्या सर्वोच्च पदाच्या राष्ट्रपतीची जबाबदारी सांभाळणाऱ्या स्त्री सांगावं...नेमकं स्त्री चं समाजातील कोणतं स्थान सांगावं..?.एकेकाळी चूल आणि मूल सांभाळणारी आमची स्त्री...घराच्या उंबरठ्यात स्थानबद्ध असणारी स्त्री आज सातासमुद्रापार जाते...अवकाशात मजल मारते. जिच्या शिक्षणाची दारे एक...