'सर्वगुणसंपन्न सर्वांगसुंदर व्यक्तिमत्त्व : गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी.'

'सर्वगुणसंपन्न सर्वांगसुंदर व्यक्तिमत्त्व : आदरणीय गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी.' सांगली जिल्ह्यातील विटा शहराजवळच्या माहुली या छोट्याशा गावी श्री.दत्ताजीराव भाऊसाहेब देशमुख व सौ.विजयालक्ष्मी दत्ताजीराव देशमुख या पुण्यशील दाम्पत्याच्या पोटी आठ लेकरं जन्मली.म्हणतात ना..."शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी." तशी ही लेकरं. आणि त्यातले रसाळ गोमटे शेंडेफळ म्हणजे परमपूज्य गुरुवर्य इंद्रजीत देशमुख (काकाजी) ऊर्फ वासुदेवानंद सरस्वती.काकाजींना तीन भाऊ व पाच बहिणी अशी एकूण आठ भावंडे. एकंदरीत मोठा परिवार.१९ ऑक्टोबर १९६५ रोजीचा काकाजींचा जन्म..आज सर्व आबालवृद्ध आदराने व मायेने त्यांना काकाजी म्हणून संबोधतात..आई विजयालक्ष्मी देशमुख जुनी अकरावी पास असलेल्या तर वडील श्री दत्ताजीराव भाऊसाहेब देशमुख १० वर्षे आमदार होते.मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून प्रथम ज्या दोन आमदारांनी त्यावेळी राजीनामा दिला,त्यापैकी एक काकांजीचे वडील होते.काकाजींच्या वडिला...