'कोरोना विरुद्धची लढाई जिंकायचीय आपण.' - किरण चव्हाण.

✊ कोरोना विरुद्धची लढाई जिंकायचीय आपण.'✊ कोरोना...कोरोना...कोरोना... ऐकावं...पहावं...बोलावं असं सर्वकाही व्यापून ठेवलं आहे कोरोनानं...आज संपूर्ण जगभरात या विषाणूनं थैमान घातलय... अखंड मानवजातीला हैराण करून सोडलंय..एखाद्या दुरदेशात ज्याची उत्पत्ती व्हावी आणि बघ ता बघता आपला देश.. राज्य...शहर..गाव आणि घरापर्यंत मजल मारावी..याचाचं अर्थ आज त्यानं कोणत्याच सीमा मागे ठेवलेल्या नाहीत.. मानवी शरीर हे त्याचं आश्रयस्थान.. माणूस हा त्याचा वाहक.. माणसाकडून माणसाकडे संक्रमण करीत सुरू असलेला त्याचा सर्वव्यापी प्रवास...माणसामाणसांची शृंखला जोडून त्याने आज जगभर आपलं जाळं विणलय. संपूर्ण जग व्यापलंय. आणि कोरोना नावाच्या या अदृश्य विषाणूने जणू माणसांविरुद्ध युद्ध ...