देशाची भावी पिढी घडवणाऱ्या शिक्षकांच्या वाट्याला ही परिस्थिती येणं हे खूप मोठं दुर्दैव. - रुचिता चौधरी (पत्रकार)
देशाची भावी पिढी घडवणाऱ्या शिक्षकांच्या वाट्याला ही परिस्थिती येणं हे खूप मोठं दुर्दैव. - रुचिता चौधरी (पत्रकार) आपल्या कामाची पावती एका पुस्तकाच्या पानावर जेव्हा छापून येते त्यापेक्षा अजून कुठला आनंद हवा.. तर असो मुद्दा हा आहे. लेखक किरण जी चव्हाण लिखित" विनाअनुदानितची संघर्षगाथा" हे पुस्तक नुकतेच शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांचे हस्ते प्रकाशित झाले. जे देशाचे भावी आधारस्तंभ घडवितात अशा शिक्षकांची विनाअनुदानितचे लेबल चिकटवून होत असलेली दैना या पुस्तक रुपाने जगासमोर आली. कारण असेच एक विनाअनुदानित शिक्षक किशोर पाटील सर यांचा जीवनपट लेखक किरणजींनी आपल्या संघर्ष गाथेत सविस्तर मांडलाही आहे. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या त्यांची एक विद्यार्थिनी म्हणून पैशा अभावी त्यांच्या मरण यातना मी "ह्याची देही ह्याची डोळा" पाहिल्या आहेत ,अनुभवल्या आहेत.माझ्या जीवाची घालमेल तर तेव्हा झाली जेव्हा विनाअनुदानितच्या नावाखाली दहा वर्ष विनावेतन सेवा द...