माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. - किरण चव्हाण.
.jpeg)
माती, पंख, आकाश : फुटबॉलक्वीन अंजु तुरंबेकरचा प्रवास. ती एका चिमुकल्या गावात जन्मलेली शेतकरी कुटुंबातली चिमुकली पोरं. शेतीभातीच्या जीवावर संसार करणाऱ्या आईबापाच्या घरात मोठी झाली.कोवळ्यापणीच तिचं नातं शेताबांधाशी, राना-शिवाराशी, गुरा-ढोरांशी जडलं... तिलाही वाटायचं रानपाखरू होऊन स्वछदीपणे रानभर भिरभिरावं, गल्ली घरात हुंदडावं, अंगणात परसात बागडावं.. पण हे सगळं तिला स्वप्नवत होतं.. कारण तिच्या कोवळेपणीच तिच्या शिरावर जबाबदारीचं ओझं लादलं गेलं होतं.. गुरा ढोरांच्या मागे रानोमाळ पालथा घालणारी अशी ती. मातीशी तिचं घट्ट नातं होतंच पण आकाशाची ओढही तिला लागलेली असायची... आकाशातून एखादं विमान गेलं तर मोठ्या कौतुकानं ते बघत आपल्या हाताचे दोन पंख करीत ती आडवी तिडवी रानोमाळ पळायची. तिचं मनपाखरू त्या विमानाचा पाठलाग करून आकाश फिरून यायचं... काही तरी नातं होतं तिचं आकाशाशीही...ती गोठ्यातलं शेण काढायची.. शेणाची बुट्टी डोकीवर घेऊन शेणी वळायची..चुलीत लाकडं कोंबून पेटत्या चुलीवरच्या तव्यावर उबदार धुराचे लोट डोळ...