शिक्षकदिनादिवशीच किशोर पाटील या विनाअनुदानित शिक्षकाने घेतला अखेरचा श्वास. करणखेडा ता- अमळनेर जि- जळगाव ते पुणे-कोल्हापूर परतीचा प्रवास करताना अतिशय दुःखद अंतःकरणाने लिहितोय. ज्या माणसासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आम्हीं भेटायला गेलो तो माणूस त्या सकाळीच निघून गेला होता. आम्हीं तिथे संध्याकाळी पोहोचल्यानंतर कळालं की, सर सकाळीच निघून गेले. सर आजारी आहेत म्हणून त्यांना पाहण्यासाठी माझ्या गावापासून म्हणजे पांगिरे ता भुदरगड जि कोल्हापूर येथून दुपारी ३ वाजता मी आणि माझी थोरली बहीण बाहेर पडलो गाड्या बदलत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६.:३० वाजता जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील करणखेडा या गावी पोहोचलो. तिथे पोहोचण्यासाठी तब्बल २७ तास ३० मिनिटांचा आणि सुमारे ८०० कि. मी. चा हा प्रवास करताना फक्त मनात एकच आस होती की,ज्यांच्याबरोबर आजपर्यंत फक्त फोनवर बोलणं व्हायचं त्या सरांना एकदा जवळून प्रत्यक्षात पाहता येईल. ..पण सरांना प्रत्यक्षात पाहणं आमच्या नशिबातच नव्हतं..आम्हीं पोहोचण्याच्या अगोदरच सर या जगातून निघून गेले होते.आम्हीं पोहोचलो आणि समोर सरांचा मुलगा पारसला बघून मन...