पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोरोना गीत- कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं...किरण चव्हाण.(पांगिरे)

इमेज
(आरं आरं माणसा तू येडा का खुळा रं...या चालीवर) ----------------------------------------------                 कोरोना गीत... कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं... आरं आरं माणसा तू येडा का खुळा रं कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं... कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं...(कोरस)...!!धृ!! समजून घे तू या कोरोनाचा धोका कुठं कसा पसरलं नाही तो भरोसा गाफील तुम्हीं राहू नका,सावध असा रं कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं...!!१!! साऱ्या जगामधी त्यानं थैमान घातलया, माणसाच्या जीवासंग खेळ खेळतुया मरण झालंय स्वस्त इथं भान असू द्या रं कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं..!!२!! तरी तुला कसं....कळना माणसा..? फिरतोस जिथं तिथं वाचशील कसा..? नको येड्या फिरू कुठं घरी थांबूया रं.. कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं..!!३!! देव आपुला रं आता देवळात नाही डॉक्टर,नर्स,पोलिस तोच, काळजी आमुची वाही नको होऊ कृतघ्न तू त्यांचे जाण उपकार कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं..!!४!! नको घाबरू तू नको सोडू आशा दूर होईल संकट मिळल जीवाला दिलासा.. कोरोनावर मा...

'गावकुसातील कथा' -'इस्वासघात' - किरण चव्हाण. (पांगिरे)

इमेज
            'इस्वासघात'                                 सात वरसाची आसल तवा गळ्यात माळ पडली.एक सवतर भण आदीच या घरात दिली व्हती.आणि आता दोघी सख्खा भणी सख्या जावा म्हणून अशा मिळून तिघी भणी एकाच घरात नांदणार व्हत्या.आडमुठ्या तिघी एकाच घरात कशा द्यायच्या...? पानोठ्यावरनं तिघीनी पाणी कसं आणायचं..? म्हणून.. दोघा पाहुण्यांस्नी कोडं पडलं.मग काय नवरीच्या बापानं मंडपात गायच आणली आणि एक आगुदरच दिल्याली लेक, आता दोघी सख्या भणी आणि चवथी गाय अशी तडजोड करून घर भरणी करून दिली. सखू आणि शारु सख्या भणी आणि मालू सवतर भण सख्या जावा म्हणून नांदायला लागल्या...सखु रंगानं काळी आणि शारु तिच्यापरास उजवी व्हती,रंगानं पण गोरी.साताप्पा मुंबईत कामाला.. त्यामुळं राहणीमान जरा शहरी..थोरला भाऊ गावाकडं शेतीभाती बघायचा. धाकटा साताप्पा नवरा म्हणून एकटाच नवऱ्या बघायला आला..थोरला आलाच नाही त्यानं सांगूनच टाकल्यालं "आप्पा तू एकटाच जा पोरगी बघायला..मी आदीच एकदा बघितल्यात ती काळी हाय ती थोरली मी करून घेतो..नी धाक...

आत्मकथा - 'एक होती आज्जी'- किरण सुभाष चव्हाण.

इमेज
                                                             'एक होती आज्जी'.                                                                 एक छोटंसं गाव.गावच्या पोटात शिरणाऱ्या हमरस्त्याच्या वेशीलगत एका बगलेवर आटोपत्या फांद्यांचं वडाच जुनाट झाड.त्याच्यापुढं उत्तरेला पुढा करून भैरवनाथाचं मंदीर. या मंदिरांच्या मागच्या खोलीत मराठी शाळा भरायची.तिथून जरा मावळत्या अंगाला दोन घरांच्या मधी दोन गुंठे होईल एवढी मोकळी जागा आणि जागेच्या एका कोपऱ्यात उत्तरेला दार असलेलं दगडा मातीचं साधारण पुरुषभर उंचीचं झोपडीवजा नकाड घर.शेणामातीन सारवलेलं कांबटाचं दार.शेणानं सारवलेला मातीचा गुळगुळीत ओटा.वरती साधी कौलं. घर असं म्हणता येणार नाही अशा त्या झोपडीत माझी आज्जी एकटीच रहायची.उभ्या नाकाची,म...

गावकुसातली कथा: 'डोरलं' - किरण चव्हाण (पांगिरे)

इमेज
                                                                            'डोरलं'                     एका नीजंवर या कुशीवरनं त्या कुशीवर आंगाची नुसती तळमळ सुरू झाली. जीवाची आतल्या आत तगमग.आंगात फणफणून ताप नी उरात धाप.जरा हातरुणात आडवं पडलं तर वरची वर आणि खालची खाल हवा व्हायची.छाती नुसती भात्यासारखी धापत व्हती.आत किती भरून घिवू नी बाहेर किती सोडू.दम घोटायचा.पाण्यावाचून माशाची तळमळ व्हावी तशी जीवाची गत.. गडी घोटमाळून गेलता. रखमाला तर ती कळकळ बघवत नव्हती...जीवात जीव नव्हताच तिच्या.कुठं छातीत चोळ... पाठीत चोळ..पदरानं आंग पूस.फडक्यानं वारा घाल.अशी ती करत व्हती.आता या वक्ताला राचं गावात कुठला डाक्टर..? आता कुठं घिऊन जाऊं नी कुठं ठेऊ असं तिला झालतं... जरा तांबडं फुटलं आसतं म्हंजी कशीबी वाट धरली आसती... जरा सलोम पडायचा आणि परत धाप सुरू व्हायची.....

'जोडी... पांडू आणि हौसाची.'

इमेज
                'जोडी... पांडू आणि हौसाची.'                                                                         गल्लीच्या वयल्या अंगाला पांडू नी हौसाच्या जोडीचं छोटसं घरटं. तरीबी 'धा' वरसापूर्वी दुसऱ्या डाव बेघर म्हणून बांधल्यालं. दारालगत आत आर्ध्या भीतीच्या आडोश्याला चूल. चुलीच्या बानोश्यावर अर्ध्यापतोर रकॅल भरल्याली संत्रा बाटलीची तयार केल्याली चिमणी. नावाला मोजकी जरबंदी भांडीकुंडी, बुडाला काळ्या ठिपक्यांची जरबंदी भुगुणी.सतरा ठिकाणी चेप खाल्याला स्टीलचा तांब्या.पाणी साटपाला दोन तीन लबरी घागऱ्या,एक मोठं जरबंदी भुगुण.तिथंच मागं जळणाच्या लाकडांचा ढीग.त्येला तिरपा करून ठेवल्याला तुरकाटीचा भारा.चार इटावर ठेवल्याली लाकडी पेटी.खोपड्याला लागून कंबरंएवढ्या मापाची न्हानगी कनींग.त्येजावर धडूतं-बिडूत कायबाय ठिवल्यालं.एका खुट्टीला दोन चार नव्यापाण्या दोरीच्या जोड्यांची ...