कविता तिन्हींसांजेच्या - तिन्हींसांजेचे सुख...किरण चव्हाण.

'तिन्हींसांजेचे सुख...' लावलीस...देव्हाऱ्यात लामण दिव्याची सांजवात. आता बस बघू अशी माझ्या पुढ्यात.. काय निरखतेयस अशी एकसारखी. बघ तुझ्या डोळ्यांतही तिन्हींसांज दाटून आलीय. तिथेही एक लामनदिवा जळतोय सांजेचा. तेवतोय तळ पापणींच्या खाचेतल्या नितळ पाण्यावर. नको पापण्यांची उसंत काढून घेऊ. नको नको हलकीशीही पापणी ढळू देऊ नकोस. नाही तर मिटल्या पापण्यात दडेल ना तो...विझेलही... कसा तेवतोय बघ हळुवार तुझ्या नितळ पवित्र ओल्या डोळ्यांत. कडकोपरा उजळवलाय काजळ काळ्या काठांवरही ओसडंलाय. ती वात तान्ह्या अंगाने कशी शहारतेय बघ..सोसवेना का तिला सांजवाऱ्याचा झोत. कसे गं तुझे पुरातन राऊळासारखे हे निरामय नेत्ररूप. जुनेपुराणे देखणेपणाचे मनमोहक प्रसन्न पवित्र तीर्थस्थळच. दोन नयनपात्रांच्या काठांवर विसावलेत अलगद समाधिस्त दोन पानमोती. त्या मोतीयांच्या नितळकाचेतून सळसळणाऱ्या सोनसळी किरणांचे सोनेरी कवडसे.. हळुवार बिलगतायेत माझ्या नेत्रकटाक्षी. माजघरातील सांदकोपऱ्यात घुटमळणारी अवघी शांतता विसावल...