बालकविता- :'चंपू आणि ससोबा.' - किरण चव्हाण.


 'चंपू आणि ससोबा.'


एक होता चंपू त्याचा मित्र गंपू

मारत होते गप्पा चंपू आणि गंपू


चंपू बोलत होता आणि गंपू ऐकत होता

काय बरे चंपू गंपूला सांगत होता..?


रात्री म्हणे एक पडले होते स्वप्न

चंपूच्या स्वप्नामध्ये आले बरे कोण..?


दिसत होते मला हिरवे हिरवे रान

रानावरती आले सशाचे पिल्लू छान


गुबगुबीत त्याचे इवलेसे अंग

अंगावरच्या केसांना पांढुरका रंग


येऊन माझ्या जवळी म्हणतो कसा मला

चंपूदादा तुम्हीं माझ्या घरी चला


मग गेलो ना हो मीही मागून त्याच्या घरी

गाजरांची बाग होती परसात भारी.


ससोबाने मला खायाला दिले गाजर

तेवढ्यात त्याचे आईबाबा झाले हजर.


ससोबाच्या संगे मी खुप खेळलो भारी.

फिरायला गेलो आम्हीं जंगलात दुपारी


कुठून कशी ऐकू आली वाघाची डरकाळी

माझी तर पार बोबडी वळाली.


ससोबा गेले पळून मला रडू आले

तेवढ्यात मला आईने जागे केले.

टिप्पण्या

  1. बालकविता सुंदर आहे. छान सर बालसाहित्याचा ज्यांना ध्यास त्यांचे
    मन ही असते झकास.बालकांचे करिता खरंच लिहित रहा या बाल रचणेस शुभेच्छा
    ------जयसिंगराव देशमुख

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"सोशल मीडिया आणि विद्यार्थी: फायदे, तोटे आणि काळजी घेण्याचे मार्ग"

भारताची जलतरणपटू कांचनमाला पांडे-देशमुख- किरण चव्हाण.

'सर्वगुणसंपन्न सर्वांगसुंदर व्यक्तिमत्त्व : गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी.'