एक चित्तथरारक अनुभव."धाडसी तरुणाचा प्रयत्न: नेट हाऊस वाचवताना गाडी जळून गेली"



 एक गाडी उभी करायचीय कारण...


               ही गोष्ट आहे एका जिगरबाज तरुणाची आणि पेटलेल्या त्याच्या गाडीची. त्या दुपारच्या चित्तथरारक घटनेचा मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. आज आपण आजूबाजूला पाहतो डोंगराला आग लागण्याचे किंवा मुद्दामहून लावण्याचे प्रकार सर्वत्र दिसून येत आहेत.म्हणजे आग लावतो कोण आणि त्याच्या झळा सोसतो कोण अशी परिस्थिती..   असाच एक भर दुपारचा प्रसंग होता तो. उतुरकडून पिंपळगावच्या दिशेने येताना नवकृष्णा व्हॅली स्कुल जवळचा.कडकडीत उन्हात  खालून डोंगर पेटत येऊन नेट हाऊसच्या खालच्या बांधला असणाऱ्या गवताने पेट घेतला आणि क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. एक तर कडाक्याचे ऊन आणि वारा त्यामुळे आग जलद गतीने पसरत होती. गवत पेटून आगीचे लोळ उठत होते. आणि जवळजवळ ही आग आता त्या नेट हाऊसला लागणार अशीच सगळी परिस्थिती निर्माण झाली होती. पण हातात पाल्याचे डहाळे घेऊन मिळेल ते साधन घेऊन नवकृष्णा व्हॅली स्कुलचे प्राचार्य रामकृष्ण मगदूम आणि त्यांचे सहकारी शिक्षक,कर्मचारी तसेच  रस्त्याने येणारे जाणारे वाटसरू आपली गाडी थांबवून ती आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते. आग पसरू नये व  नेट हाऊसला आग लागू नये म्हणून लोक शर्थीचे प्रयत्न करत होते. तर कोणी तिथले पाणी उपलब्ध करून पाण्याची घरगुती वापरातील छोटीशी पाईप घेऊन जिकडे आग आहे तिकडे धावतपळत ती आग विझवण्यासाठी धडपडत होतें. तरी देखील नेट हाऊच्या अगदी आग जवळ आली आणि कोपऱ्याला काही भागात आग लागली आणि आता एवढे मोठे नेट हाऊस धडाडा जळणार.. आगीच्या  भक्ष्यस्थानी पडणार असेच वाटत होते.. परंतु काही जिगरबाज तरुण जीवावर उदार होऊन त्या नेटच्या अगदी जवळ जात तर काहीजण आत जाऊन  अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी कसोशीने  प्रयत्न करीत होते. शेवटी एका कोपऱ्याला आग लागलीचं पण लोकांनी पाल्याच्या डहाळ्यांचा सपासप मारा करून ती आग पुन्हा विझवली.

 पण या नेटहाऊसला वाचवण्याच्या नादात एक तरुण आपली मोटरसायकल रस्ताच्या कडेला उभी करून तो नेट हाऊसच्या आत शिरून आग विझवण्यासाठीप्रयत्न करीत होता. पण तोपर्यंत इकडे रस्त्याच्या काठाला असणाऱ्या गवताने हळूहळू पेट  घेतला आणि काही क्षणातचं आगीचे प्रचंड लोळ उठले, त्या ज्वाळा उफाळून वर उठत होत्या आणि काही कळायच्या आतचं त्या आगीच्या लोळाने त्या रस्त्याकडेला उभ्या असलेल्या गाडीलाही वेढले. क्षणात ती गाडी आगीच्या आणि धुरांच्या लोळात गुरफटून गेली. ती आग इतकी भयंकर होती की, पुढे जाऊन ती गाडी काढणेचं शक्य नव्हते आणि तो प्रयत्न केला असता तर जीवाला धोका होता.आम्हीं अग्निशामक दलाल फोन लावत होतो पण प्रतिसाद शून्य, तो ही प्रयत्न निष्फळ ठरला.इतके लोक जवळ असूनही नुसत्या डोळ्याने बघण्यापलीकडे

काहीच करता येत नव्हते. डोळ्यादेखत ती गाडी धडाडा जळत होती.संपूर्ण गाडीने अक्षरशः पेट घेतला होता. "गाडी पेटली म्हणून लोक ओरडायला लागले तेंव्हा त्या नेट हाऊसच्या आत आग विझवणारा तो तरुण बाहेर आला जेंव्हा ते दृश्य पाहिले तो खालीच कोसळला. गाडी जवळ जाऊ पाहणाऱ्या त्या तरुणाला लोकांनी अडवले तो पूर्णपणे भांबावून गेला होता. त्याची ती अवस्था मनाला हेलावून टाकणारी होती. समोर उभी गाडी पेटत असताना व्यर्थ धडपड करण्यापलीकडे हातात काहीचं नव्हते. गाडीने इतका पेट घेतला होता की,पुढे जाण्याची कुणाचीच हिंमत नव्हती. "कुणीतरी बोलले सर्वांनी लांब व्हा गाडीचा स्फोट होणार"  आणि तसंच झालं काही क्षणात एक मोठा आवाज झाला अर्थातच गाडीचा स्फोट झाला आगीचा लोळ आकाशाच्या दिशने झेपावला आणि गाडी जमिनीवर पडली. आता फक्त तिचा सांगाडा दिसत होता. शेवटी पूर्णपणे गाडी जळून खाक झाली. काही वेळाने आग विझवायला गेलेल्या त्या तरुणाचा भाऊही तेथे आला आणि जळणारी गाडी पाहून तोही मटकन खाली बसला दोघांच्या डोळ्यांत अश्रू होते. आजूबाजूच्या लोकांनी कशी तरी त्यांची समजूत घातली.

     काही वेळानंतर तोच तरुण तिकडे आपली गाडी जळत असताना इकडे पुन्हा आग विझवायला येत होता. ही किती मोठी जिगर म्हणायची.

            दुसऱ्याची आग विझवताना ज्याची गाडी जळाली त्या जिगरबाज तरुणाचं नाव आहे. गिरीश प्रकाश कुंभार वय २६ राहणार आजरा.प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुटपुंज्या पगाराची नोकरी आहे..परिस्थिती बेताची आहे. घरी आई आजारी असते. अशी सगळी परिस्थिती. रस्त्याने जात होता बिचारा.. बाजूला काही तरी जळताना थांबला त्याच्यातल्या माणुसकीने त्याला थांबवलं. तसे तर हे सर्व पाहून त्याला पुढंही जाता आलं असतं..पण तसं त्याने नाही केलं..?  त्याच्या हृदयात होता माणुसकीचा ओलावा म्हणून त्या आगीवर तो ओलावा शिंपडण्यासाठी गेला होता. त्या कामाचं त्याला कुणी प्रशस्तीपत्र देणार नव्हतं ना कोणी कौतुक करणार होत . तरी ही तो जीव संकटात टाकून गेला. दुसऱ्याचं नंदनवन वाचवण्यासाठी त्याला स्वतःच्या गाडीची राखरांगोळी करून घ्यावी लागली...निरपेक्ष कार्याचं याहून मोठं उदाहरण नाही. मित्रा आग विझवताना तुझ्या गाडीची भलेही राख झाली असेल पण त्या राखेतून तू लाखमोलाचा आदर्श समाजाभान कसं जपावं, दुसऱ्यांच्या मदतीला निरपेक्ष भावनेने कसं धावून जावं. 


एक गोष्ट सर्वांना ज्ञात आहे जंगलाला आग लागली होती बिचारी चिमणी ती आग आपल्या चोचीतून पाणी आणून विझवत होती कुणीतरी विचारलं अंग तुझ्या इवल्याशा चोचीतून आणलेल्या पाण्याने ती आग विझणार आहे का..? त्यावेळी ती उत्तर देते आग विझणार नाही पण उद्या जेंव्हा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी माझं नांव आग लावणाऱ्यांच्या यादीत नाही तर विझवणाऱ्यांच्या यादीत असेल..मित्रा त्या चिमणीप्रमाणे तिच्याही पुढे जाऊन स्वतःच जळत असताना दुसऱ्यांचं विझवण या कार्याचा इतिहास लोक सदैव लक्षात ठेवतील..

              समाजात नेहमी दुसऱ्यांच्यासाठी धडपडाणाऱ्या माणसालाचं झळ बसत असते. पण जो समाजासाठी उभा राहतो त्याच्या पाठीशी समाज असतो. मंडळी आता आपली जबाबदारी आहे असं उदात्त काम करणाऱ्या व्यक्तीच्या मागे आज आपण उभं राहिलं पाहिजे. जो इतरांना वाचवण्याची भूमिका ठेवतो त्याला वाचवण्याची जबाबदारी ही समाजाची आहे. आणि समाज म्हणून हे आपलं हे कर्तव्यच आहे आणि आज जत का हे कर्तव्य निभावत नसू  जीव संकटात टाकून  आपलं नुकसान करून  आग विझवणाऱ्या त्या तरुणाच्या मागे आज आपण उभे राहिलो नाहीत तर दुसऱ्यांच्यासाठी धडपडणारी माणसं पुन्हा कधीही उभे राहणार नाहीत. गाडी जळून गेली हे मोठं नुकसान नाही कारण गाडी पुन्हा मिळवता येईल. पण ज्याची गाडी जळाली त्याच्या मागे आपण उभे राहिलो नाहीत ना तर त्याचा हौसला विझून जाईल.जो पुन्हा मिळवता येणार नाही.आणि समाजासाठी असे उदात्त कार्य करण्याची जिगर पुन्हा कधी निर्माण होणार नाही. आणि ही गोष्ट त्या गाडी जळण्यापेक्षा ही भयंकर आहे. त्यामुळे  गाडी जळाली  हरकत नाही समाजातून मदत गोळा करून तशीच एक नवीन गाडी उभी करून देऊयात, जी गाडी त्याच्या अशा उदात्त कार्याची प्रेरणा बनून राहील.म्हणून अशी एक गाडी उभी करायचीय... गिरीषच्या या धीरोदात्त कार्याला आमचा सलाम..आणि मंडळी आपल्यासारख्या संवेदनशील माणसांना आवाहन की, आज गिरीषच्या मागे आपण उभे राहुयात. आपापल्या परीने आपण मदत करूयात, त्याच्या हाती पुन्हा तशीच एक गाडी उभी करून देऊयात.

धन्यवाद..!


मदतीसाठी संपर्क - श्री. गिरीष प्रकाश कुंभार

रा - आजरा ता - आजरा जि - कोल्हापूर

मोबा - ७७६७८८३५४२


फोन पे/ गुगल पे नं - 7767883542


Bank Details

Bank Name  - HDFC Bank

IFSC Code -.   HDFC0003334

Account No-.50100281096950


खालील लिंक वर क्लिक करून या प्रत्यक्ष घटनेचा व्हिडिओ पहा.

https://youtu.be/EtVcZX_uZEQ

-----------------------------------------------------

- किरण सुभाष चव्हाण.

मोबा- ८८०६७३७५२८.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"सोशल मीडिया आणि विद्यार्थी: फायदे, तोटे आणि काळजी घेण्याचे मार्ग"

भारताची जलतरणपटू कांचनमाला पांडे-देशमुख- किरण चव्हाण.

'सर्वगुणसंपन्न सर्वांगसुंदर व्यक्तिमत्त्व : गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी.'