'मृत्युंजया..कोमल गोडसे पवार.'

'मृत्यूशी कडवी झुंज दे ऊन मृत्यूवर मात करणारी मृत्युंजया..कोमल गोडसे पवार.' एक प्राणज्योत...तेवतेय आपल्या नादात.स्वयंस्फूर्तीने उजळवतेय आपला भोवताल.पण अचानक तिच्या अवतीभोवती घोंगावू लागतं ते काळवाऱ्याचं वादळ...ती थरारते.. बिथरते...तिचा अस्तित्वासाठी संघर्ष सुरू होतो त्या वादळाशी...ते वादळ तिला मालवू पहात होतं... पण ती मात्र विझायला तयार नव्हती...पण भयाण काळवाऱ्याच्या वादळात अडकलेली ती ज्योत...हळूहळू क्षीण होत होती.तिच्याभोवतीचा काळोख अधिकच दाट होत होता.पुढचं अंधकार भविष्य कसं लख्ख दिसू लागलं होतं..तो निष्ठुर काळ तिला झुंजवत..छळत होता तिच्या प्राणांसाठी आतुरला होता..प्राण तिच्या कंठाशी आले होते.त्याने पुरता कब्जा केलाच होता. पण आता तिचाही संयम ढळत होता...तिला ही आता स्वतःहून विझू वाटत होतं...पण मुळात ती एकटी नव्हती जीवलगांचे अनेक हात तिला विझण्यापासून वाचवत होते.त्यांच्यामुळेच तर विझता विझता सावरून ती पुन्हा उभी ठाकत होती..प्रत्येक श्वासागणिक तिचा संघर्ष ठरले...