समाजभान उपक्रम - किरण चव्हाण.

'अंधारातल्या प्रगतीला प्रकाश देण्याचा समाजभानचा छोटासा प्रयत्न.'


इवल्याशा झोपडीला 

कुडामेडाचं दार गं.

साचलाय अंधार 

कुठून येईल उजेड गं.


                        दोन वेळच्या भुकेला आवर घालण्यासाठी जिथं आटापिटा करावा लागतो तिथं अंधारल्या झोपडीत कुठून येणार प्रकाशाचा किरण...कशी उजळणार ती.अंधारातल्या दोन जिवांची ही कहाणी आहे मिणचे खुर्द ता भुदरगड येथील मायलेकींची. प्रगती परीट सध्या नववीत शिकते.वडिलांचं छत्र कधीचं हरवलेलं.आई आहे तिलाही अधूनमधून फिट येते.त्यातूनही ती माय रोजच्या भुकेची तडजोड करण्यासाठी उन्हातान्हात दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरीला जाते.घरात दिवाबत्तीची सोय नाही त्यामुळे दिवसा दारातून येणारा आणि रात्रीचा दिव्याच्या मिणमिणता उजेड एवढीच उजेडाची सोबत.आज दिव्याच्या मिणमिणत्या उजेडातच प्रगतीला आपला अभ्यास उरकून घ्यावा लागतो..

                      आज एक सावित्रीची लेक अंधारात आपलं जीवन घडवू पाहतेय..'ज्ञानदीप लावू जगी' असं फक्त म्हणायचं आपण. पण शेजारच्या एका ज्ञानज्योतीच्या अंधारल्या झोपडीत आज एक दिवा देता येत नाही...दिवाळीला तर घरादारावरून लखलखत्या प्रकाशाचा झोत ओसंडुन वाहत असतो. पण अंधारानं मुजलेल्या घरात एक प्रकाशाचा झोत झळकावा असं कुणाला वाटत नाही..?

                  पण गुरुवर्य इंद्रजीत देशमुख (काकाजींची) विचारधारा हीच आमची जीवनधारा या विचारांची कास धरून वाटचाल करणाऱ्या समाजभान उपक्रमांतर्गत आज प्रगतीदिदीला सोलर लँप तसेच धान्यस्वरूपात मदत देण्यात आली.सोलर लँपसाठी उमेद फाउंडेशनचे भरीव योगदान लाभले.यावेळी समाजभानचे शिवम साधक श्री. सागर गुरव,आकाश पाटील व किरण चव्हाण,आशा सेविका सौ.वैशाली गुरव,श्री.बाबुराव गुरव उपस्थित होते.

 एकंदरीतच मायलेकींच्या अधांतरी जगण्याला आधारच  बळ देण्यासाठी आज समाजाच्या दातृत्वाची गरज आहे..

...धन्यवाद.!!




संपर्क : समाजभानचे शिवम साधक श्री सागर गुरव (कोळवण)

मोबा - 9146148904

-----------------------------------------------


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"सोशल मीडिया आणि विद्यार्थी: फायदे, तोटे आणि काळजी घेण्याचे मार्ग"

भारताची जलतरणपटू कांचनमाला पांडे-देशमुख- किरण चव्हाण.

'सर्वगुणसंपन्न सर्वांगसुंदर व्यक्तिमत्त्व : गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी.'