'असावे सुंदर असे माझे गांव.'-किरण चव्हाण.

(देवा तुझे किती सुंदर आकाश या गीताच्या चालीवर) 'असावे सुंदर असे माझे गांव.' असावे सुंदर असे माझे गाव गुण्यागोविंदाने सर्वांनी रहावं नको कुणी दुःखी असो सर्व सुखी गोड वाचा असो सर्वांमुखी गरीब श्रीमंत नको भेदभाव सर्वांभूती असो समभाव आपणची ठेऊ गावची स्वच्छता दिसावी सर्वांना सुंदरता गावाचा विकास मिळुनी करूया आम्हीं प्रगतीची कास धरूया लहानांची कदर मोठ्यांचा आदर एकत्र कुटूंब तेचि सुखी घर गुणी सज्जनांचा असो अधिवास करावा उपदेश सकळ जनास अवघाची गांव एकीने नांदावं समृध्द संपन्न गांव माझे व्हावं.