चष्मा - किरण सुभाष चव्हाण.

 

चष्मा...

चष्मा घालतात माणसं..
मग स्पष्ट दिसायला लागतं.
न ओळखता येणारी
दुरवरची माणसंही
ओळखता येतात..
तसे चष्मे पारदर्शक असतातचं..

पण

जातीचे,
धर्माचे,
प्रातांचे,
भाषेचे,
सीमांचे,
रंगाचे...

चष्मे घातल्याने स्पष्ट दिसेलच असं नाही
समोरील माणूस आणि

जवळचा माणूस देखील

माणूसचं आहे म्हणून

ओळखताही येत नाही.

तसे चष्मे असतातच पारदर्शक
पण त्यामागची दृष्टी असेलच असं नाही.

- किरण सुभाष चव्हाण

टिप्पण्या