भाऊ आणि बहीण

भाऊराया…

ओवाळीते भाऊराया, माझ्या जीवाची गं माया, माझ्या रूपाची छाया, माझा गं भाऊराया… न्हाऊ घालते घालते, पाटावरी बसवुनी, दृष्ट काढते काढते, काजळ-तीट लावुनी. माझ्या अवतीभोवती फिरतो गं माझा भाऊ, जशी गाईच्या भोवती फिरते लाडाचं वासरू. माझा गं तो पाठीराखा, त्याची डोंगराएवढी माया, बापासारखा त्याचा आधार, त्याला देईन आईची माया. उद्याले मोठा होईल, माझ्या सासरी गं तो येईल, माझ्या माहेराचा तो मुराळी, मला माहेरी घेऊन येईल. माझा गं तो निवृत्ती, माझा गं तो ज्ञानोबा, माझा इवलासा सोपाना, मी गं त्याची मुक्ताबाई. ओवाळीते भाऊराया, भाऊ माझा सुखात राहू दे, देवा माझ्या लाडक्या भावाला उदंड आयुष्य लाभू दे…

✍️ लेखक: तुमचं नाव

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक दिनीच घेतला अखेरचा श्वास... विनाअनुदानित शिक्षक किशोर पाटील यांचा करुण अंत | १५ वर्षांची अध्यापनाची नि:स्वार्थ सेवा करून शेवटपर्यंत पगार मिळाला नाही.

'सर्वगुणसंपन्न सर्वांगसुंदर व्यक्तिमत्त्व : गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी.'

"सोशल मीडिया आणि विद्यार्थी: फायदे, तोटे आणि काळजी घेण्याचे मार्ग"