पोस्ट्स

आयुष्याच्या संध्याकाळी. लेबलसह पोस्ट दाखवत आहे

'आयुष्याच्या संध्याकाळी हवाय एक निवारा... मायेचा उबारा...समाधानाचा किनारा.'

इमेज
'आयुष्याच्या संध्याकाळी हवाय एक निवारा... मायेचा उबारा..समाधानाचा किनारा.'   "पांडुरंगा...दुख सांगायचं तर कुणाला सांगायचं...म्या तुझा माळकरी.२२ वरसं झाली  तुझी माळ गळ्यात हाय.नेमानं  तुझ्या पंढरीची वारी करतू…म्या पंढरीचा वारकरी.. "संसार पंढरी आम्हीं वारकरी... आगा पांडुरंगा सुखी ठेव सारी.." असा अभंगाचा सूर कधी भजनात आळीवायचो...तुझ्या हरिनामात दंग व्हवून जायाचो...पण तुझ्या पंढरीच्या वाटचा हा वारकरी कधी भिकारी झाला कळालंच न्हाई बघ...कुणाला माझं दुख सांगायचं...आता हाय का माझं तुझ्याबिगार कुणी...? कोण ऐकून घिल माझ्या येड्यागबाळ्याचं...आन ऐकून घ्यायला कुणी जवळ तर यायला पायजे नवं... कोण ईल माझ्याजवळ आता...मी तर एक म्हारोगी..."                         हे आहेत श्री.सदाशिव रावबा सुतार भुदरगड तालुक्यातील हेदवडे हे गांव.वार्धक्याकडे झुकलेलं अंदाजे ८० पर्यंत वय.पत्नीनं अर्ध्यावर साथ सोडली.  पोटाला एक मुलगा.कष्टकरी जीवन...सुतारकाम करण्यात उभी  हयात गेली...टीचभर पोटासाठी आजही उतारवयात कष्ट सुरू...