पोस्ट्स

आशा व अंगणवाडी सेविका. लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कोरोना योध्या रणरागिणी आशा व अंगणवाडी सेविका....- किरण चव्हाण.

इमेज
कोरोना योध्या रणरागिणी आशा व अंगणवाडी सेविका.... "मामा...मावशी...दादा...ताई कोण आहे का घरात.?." "या बाहेर...या..." "चला हात पुढं करा...थोडे लांब उभे रहा..." "मावशी...ऑक्सिजन चांगला दाखवतोय तुमचा ..टेम्प्रेचरही चांगलं आहे.." "आज्जीबाई तुमचं ऑक्सिजन कमी दाखवतोय..". "काय त्रास होतोय..?" "कुणाला काही.. बी.पी..शुगरचा त्रास..? "घरात कोणाला थंडी- ताप, सर्दी-खोकला..." "कुणाला काही त्रास..असेल तर सांगा...दवाखान्यात दाखवून स्वॅब तपासून घ्या." "घराबाहेर पडताना नेहमी मास्कचा वापर करायचा.." "वरचेवर साबणाने हात धुवायचे किंवा सॅनिटायजर वापरायचे... कारण नसताना घराबाहेर पडायचं नाही....अशक्तपणा वाटत असेल तर लिंबूपाणी प्यायचे.." "आणि हो कोरोनाला घाबरायचं नाही पण काळजी घ्यायची आपली व आपल्या माणसांची...कळलं का...?" हे काळजीवाहू बोल आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ऐकायला मिळतील...प्रत्येक गाव,शहर गल्लीबोळ, अगदी सांदीखोपड्यातल्या प्रत्येक घरासमोर जाऊन कोविड सर्वेक्षण करणाऱ्या या आहेत आपल्या आशा ...