जात्यावरच्या ओव्या...किरण चव्हाण.

पहाटेच्या शांत समयी...दिव्याच्या मंद तांबूस उजेडात... जात्यावर दळण दळणारी माय... जात्याची कर्णमधुर घरघर...आणि मायेच्या गोड गळ्यातील मंजुळ ओव्या...नितांत सुंदर. ' जात्यावरच्या ओव्या' पहाटंच्या ओव्या गात जात्यावं दळीते | रामाधरमाच्या गं पारी गणगोत मांडीते || कीर्ती जगी बाई त्यांची सांगिते | ऐकायाला ये रं बा तू पंढरीच्या विठ्ठला || पहिली माझी ओवी गं प्रभू रामचंद्राला | सीतामाई शोधासाठी वणवण फिरला || घेऊनिया वानरसेना सेतू सागरी बांधीला | माथा टेकवितो बाई ऐशा पतिराजाला || दुसरी माझी ओवी गं किती गुण गाऊ गं | पती सत्यवानाचा जीव घेऊन आली गं || पत्नीधर्म पाळावा कसा गं बाईन | पतिव्रता सावित्री जशी गेली होऊन || तिसरे माझे वंदन थोर आई बापाला | पुण्याईचे फळ आले संत त्यांच्या पोटाला || निवृत्ती-ज्ञानेश्वर...सोपान-मुक्ताई | भक्तिभाव ज्ञान अवघ्या जगाची माऊली || चौथे माझे नमन जिजाऊ बाईला | पुत्र असा घडविला शोभे राजा प्रजेला || शूरवीर घेऊन शत्...