'गावंदरीतलं जुळं' - किरण सुभाष चव्हाण.

'गावंदरीतलं जुळं' तरीबी या गोष्टीला बारा वरसं गुदरली आसतील.. सुगी नुकतीच मागं सरल्याली.भातकापणी झाल्याली मुंडरी वावरं सगळीकडं दिसत व्हती.भवतीनं जुंधळ्याच्या धाटांचं सड आणि डुई भादरल्यासारं भाताचं मुठ मूठभर गड्ड.सारा शिवार कस मोकळा ढाकळा. आमच्या गल्लीच्या खायल्या आंगची गावंदरबी आता रिकामी झालती.बिचारीला आता सकाळ दुपार संध्याकाळ एकेक पाहुणा अवचित भेट द्यायचाचं.रस्त्याच्या खायच्या बाजूला उतरणीला चार लांबसडक टपणी.तिसऱ्या टपण्याच्या बांधाच्या तळाला चार हात रूंद अशी लांबसडक चिरुटी व्हती त्यानंतर चौथं टपण वलाडंल की,मधी आडवा थोरला बांध..बांधावर मोजून दोनच झाडं एक काट्या बाभळीचं आणि दुसरं लिंबाचं.त्याच्याखाली उरलीसुरली टपणी.थोरली जाणती लोकं या बांधाच्या खाली परसाकडं जायाची. तवा घरा घरात संडास कुठलं...?गावंदर म्हणजे त्यायेळला मोकळं व्हायचं हक्काचं ठिकाण. ...