पोस्ट्स

चित्तथरारक कथा. लेबलसह पोस्ट दाखवत आहे

'बामणकीच्या मळीतली गोदा.'- किरण चव्हाण.

इमेज
                            'बामणकीच्या मळीतली गोदा.'                                           कदमाचा बापू आला आसल गावासनं...आता चार दिस झालं की, किती वाट बघायची...? चार दिसामागं बापू लेकीकडं गेलता...त्यायळेला बापू म्हणालता ...आता मी येणार त्ये सरळ पा-सा दिसांनच.मग आज किती दिस झालं...बोटांवरचा हिशोब आज परतच्याला मांडला.. शेवटाला अंगठा दुमडला म्हंजी बक्कळ पाच दिस झालं...आला आसल बापू..? एक मन म्हणतंय आसल एक म्हणतंय नसल.पण आता न्हाई थार व्हइत...डोसक्यात राग घालून जायाची पाळी यील.न्हाई... खुळाचं व्हईनं मी..काय व्हईल ते व्हईल...आता थांबायचं न्हाई...बापूदा आला आगर नसलबी पर आपुन तिथं जाऊन धडकायचंच.  त्याशिवाय आत्मा थंड व्हायचा न्हाई माझा...एक दिस कधी सोडून ऱ्हाता आलं न्हाई...चार दिस कसं काढलं आसतील ते माझं मला म्हाइत...डाव्या आंगाला सुमी बिनघोर निजल्याली...कवाची झोप लागल्याली तिला.आंगावरनं साप गेला तरी सूद...