पोस्ट्स

पल्लवी यादव लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ग्रेट भेट-उर्जानिर्मिती क्षेत्रातील पल्लवी यादव यांच्याशी संवाद..- किरण चव्हाण.

इमेज
ऊर्जानिर्मिती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदरणीय पल्लवी यादव यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.             ऊर्जानिर्मिती क्षेत्रात सध्या पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या समुद्रातील खनिज तेल,नैसर्गिक वायू अशा ऊर्जानिर्मिती क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने एक महिला म्हणून यशस्वी कार्य केले. १२० वर्ष जुन्या असलेल्या व ऑइल क्षेत्रात मोठं नाव असलेल्या जागतिक नामांकन 'बेकर ह्युजेस' या कंपनीत २००६ पासून त्यांनी नोकरीला सुरुवात केली.समुद्रात राहून समुद्रतळाच्या खाली तीन ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत ड्रीलिंग करून समुद्राच्या पोटातील कच्चे तेल उपसले जाते अशा ठिकाणी खनिज तेलाचे व नैसर्गिक वायूचे साठे अचुकरित्या शोधणे हे अशा महत्वाच्या कामाची जबाबदारी पल्लवी यांच्याकडे होती.हे काम सलग करावे लागते अशावेळी अनेक अडचणी व आव्हानांचा सामना त्या ठिकाणी करावा लागतो. आजपर्यंत त्यांनी इराक,कतार, युनायटेड अरब अमराती अशा आखाती देशामध्ये काम केले आहे.इराकमध्ये असताना ऑइल रिगवर एकटीच महिला इंजिनिअर म्हणून त्या काम करीत होत्या त्यावेळी पुरुषांच्या बरोबरीने एक महिला उ...