पोस्ट्स

बालकविता- चांदोमामा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

बालकविता - चांदोमामा चांदोमामा - किरण चव्हाण.

इमेज
  "चांदोमामा चांदोमामा..." चांदोमामा चांदोमामा या ना एकदा घरी रोज वाट पाहतो मी उभे राहून दारी. चांदण्यांना घेऊन या हं तुमच्या बरोबरी गप्पा मारू मिळून सारे मज्जा येईल भारी छान छान गोष्टी सांगा ऐकू आम्हीं सारी जराशीही चुळबूळ  करणार नाही. नाचू गाऊ मिळून आपण धमाल मस्ती करू तुम्हींच किती फिराल आम्हीं तुमच्या भोवती फिरू. खुप खेळून दमून भागून थोडी विश्रांती घेऊ हवं तर मग पुन्हां  आपण शिवपाट्या खेळू तुमच्यासाठी आई बनवेल  तुप रोटी मऊ अंगणात बसून आपण  सारे पोटभर खाऊ. मग शेवटी सांगा तुम्हीं कशा बदलता हो कला हळूहळू छोटे कधी मोठे  होता कळत नाही मला आकाशातले घर तुमचे आहे तरी कोठे..? फिरायाला अंगणही असेल किती मोठे.. खूप काही बोलायचंय  एवढं मनावरती घ्या ना. नका आता उशीर करू तुम्हीं भेटायाला या ना..    चांदोमामा  बघा हं  मी तुमची वाट पाहेन नाही आला तर तुमच्याशी 'गट्टी फू' चं करेन याल ना हो चांदोमामा  तुम्हीं माझ्या घरी. सोडेन ना हो  तुम्हाला  मी नक्की वेळेवरी.