पोस्ट्स

माझा अभंग - पांडुरंगा... लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अभंगवाणी - पांडुरंगा...- किरण चव्हाण.

इमेज
  'पांडुरंगा...' तूच पांडुरंगा निवारी हा काळ ।  राहिले न बळ अंगी आता  ।।  चित्त नाही चित्ती जीव जीवापाशी।  काय माझी स्थिती सांगू तुज  ।।  मुक्यापरी मन सोसतची जाय ।   किती हे सायास सहावे मी  ।।  सुखाचे कारणी दुःखाचा हा भोग ।   नाही उपभोग मज घ्यावयाचा ।।      सोसवेना आता दे गा तू आधार ।    टाकीतो मी भार तुजवरी  ।।  नको ऐसें जिणे देऊ मज देवा ।  नाही आता हेवा जीवनाचा  ।।  पुरे झाली आस नको आता वास ।  तुच माझा श्वास पांडुरंगा  ।।  काय उरे आता इथे माझेपण ।  देई मज ठाव तुजपाशी  ।।