पोस्ट्स

माझी कविता लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कविता- पैसा झाला मोठा नाती झाली खोटी....-किरण चव्हाण.

इमेज
'पैसा झाला मोठा नाती झाली खोटी.' पैशापायी माणसाला वळखू येईनात नाती. पैशाच्या मागं मागं सारी दुनिया धावती. आईबाप स्वतःचं स्वस्त झालं की गा याला, पैशानच नाही का याला जलोम दिला. भाऊ-बहीण मग तर काय लांबचीच गोष्ट, दोघच राजाराणी कसं सुखात ऱ्हात्यात मस्त. काय याचा मिजास काय तो तोरा कुणाचीही किंमत नाही, वाटतं याला माझ्यासारखा दुसरा कुणीच नाही. रोजचा हिशोब ठेवत असशील ना? किती पैसा कमावला, फक्त हिशोब नसेल याचा किती किती नाती गमवला. सगळं काही भेटत पैशानं पण एकच भेटत नाही, जीवाला जीव देणारं माणसं पैशानं मिळत नाही. बांधशील माडी वर माडी फिरायला नवी गाडी. सारं इथंच ऱ्हायाचं,तुझ्यासाठी पुरल शेवटी एकच काडी. काय घेऊन आलो नी घेऊन काय जाणार कधी विचार केला? आरं जगजेता सिकंदरही शेवटी हात हालवत गेला. फक्त पैसाच नाही येत,येती मदतीला माणसही, तवा जपतोस जसा पैसा तसं जपायला शिक नातीही.                                       - किरण चव्हाण.