वर्गातील गरमागरम भाकरीची गोष्ट – शालेय आठवणी

वर्गातील गरमागरम भाकरीची गोष्ट.... रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस परंतु रविवारी आमच्या शाळेत ८ वी विद्यार्थ्यांचा सकाळी ८ ते १० या वेळेत NMMS चा तास ठेवला होता. माझ्या गावापासून शाळेचे अंतर १५-१६ कि.मी चे अंतर असल्याने सकाळी लवकरच घरातून बाहेर पडावे लागले. सकाळच्या प्रसन्न वातावरणात तासाला सुरुवात झाली. पुढ्यात एकूण सात विद्यार्थींनी होत्या. बुद्धिमत्ता हा विषय शिकवण्यास सुरू केला. एकेक संकल्पना सोडवत असताना वेळ कधी सरला कळला नाही. विद्यार्थ्यांनीही समरस होऊन बुद्धिमत्तेची उदाहरणे सोडवत होती. अशातच जवळपास साडे दहा वाजायला आले. मुलींना बाहेर सोडले. थोड्या वेळाने आत आल्या. तास संपण्याची वेळ संपून गेली होती. पण बुद्धीमतेची उदाहरणे सोडवण्याच्या उत्साहाने त्यांना कंटाळा आला नव्हता. आता घरी सोडायचं की पुढे तास घ्यायचा यावर आमची चर्चा सुरू झाली. त्यामध्येचं आमचा दत्तराज नावाचा सातवीचा विद्यार्थी तो आपला अभ्यास करण्यासाठी वर्गात येऊन बसला होता. तो आठवीच्या विद्यार्थीनींना चिडवण्याच्या हेतूने बोलल...