शाळेतील प्रसंगानुभव...चित्र पुसलं आणि-किरण चव्हाण.

शाळेतील प्रसंगानुभव... चित्र पुसलं आणि... चारची लहान सुट्टी संपली मुलं वर्गात येण्याची घंटा वाजली.मैदानावरची सैरावैरा पावलं वर्गाकडे वळाली.घामेजून गेलेली मुलं दम खात एकदाशी आपल्या जागेवर स्थिरावली.पाचवी वर्गावर माझा चित्रकलेचा तास.वर्गप्रवेश करताच हातवारे करून सगळ्या मुलांचा एकच गिल्ला... "सर सर..आता चित्रकलेचा तास.." ही अशी मला आठवण करून देणं आणि दुसऱ्याचं क्षणी ..."चित्रं... चित्रं.... चित्रं." अशी एकच 'री' ओढली. "अरे हो हो...विचित्र मुलांनो तुम्हांला काही दमधीर आहे का नाही...अरे वर्गात तरी नीट येऊ द्याल काय लागलाय ओरडायला नुसतं चित्रं चित्रं..." असं बोलून त्यांच्या सुराला लगाम घालायचा प्रयत्न केला. काय सांगायचं या मुलांना इतर विषयांच्या वेळी यांची दमछाक होते आणि या विषयाला मात्र हे आमची दमछाक करतात..विचार केला कोणतं चित्रं काढावं बरं.?.आणि लक्षात आलं एक चित्रं पाहिलं होतं प...