पोस्ट्स

लेखक नंदू साळोखे (बेलेवाडी हु||) यांचा जीवन व लेखनप्रवास.

इमेज
       '...आणि जगण्याला शब्दांचं बळ मिळालं.'                   आजरा तालुक्यातील बेलेवाडी हुबळगी हे छोटेसं खेडेगाव.या गावातील सखाराम केरबा साळोखे व आक्काताई सखाराम साळोखेे यांच्या पोटी राम- लक्ष्मणागत दोन लेकरं जन्माला आली. थोरला मुलगा प्रकाश उर्फ नंदू आणि धाकटा सागर. एक छोटेसं शेतकरी कुटुंब.शेती हा प्रमुख व्यवसाय. या कुटुंबात २५ ऑगस्ट १९७८ रोजी नंदूजींचा जन्म झाला. एक चुणचुणीत गोरागोमटा पोर.गावच्या शाळेत जाऊ लागला, आपल्या सवंगड्यांसोबत गावाच्या मातीत खेळू- बागडू लागला. रान शिवारी सख्यासोबत्यांच्या संगतीने हिंडू फिरू लागला.गल्ली गावात दुडदुडत्या चालीने दौडू लागला. असे हे स्वच्छंदी बालपणाचे दिवस, भिंतीवरच्या कॅलेंडरच्या पानांनी कूस बदलावी तसे  मागे पडत गेले.दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं.लहानगा नंदू आता जाणता झाला.  शेताघरातल्या कामात लक्ष घालु लागला. सळसळत्या तारुण्याचं उमदं वय. कोणतंही काम करण्याचा उरात भरलेला जोश.पण एकीकडे या उमलत्या तारुण्यावर घाव घालण्यासाठी नियती दबा धरून बसलेली.     ...

मराठी वाचुया,मराठी लिहुया,मराठी जगुया.

इमेज
                           'मायबोलीचा टक्का का घसरला.?'                                  "माझा मराठाची बोलू कवतिके परी अमृतातेही पैजा जिंके"                   ज्या माय मराठीच्या लेकरांनं अवघ्या १६ व्या वर्षी असा मराठी भाषेचा गौरव करत... ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहून या मराठी भाषेला समृद्ध केले. त्याआपल्या मराठी भाषेच्या प्रांतात मायबोलीचा टक्का का घसरला..?असा प्रश्न तिच्या  लेकरांना स्वतः आपल्यालाच करावा लागतोय हे किती मोठं दुर्दैव आहे.एकेकाळी वैभवशाली समृद्धसंपन्नतेच्या शिखरावर असलेली मराठी भाषेची आज एवढी घसरण का झाली? म्हणून का  हा प्रश्न आपल्याला करावा लागतोय.मायबोलीचा टक्का का घसरला..?.या प्रश्नाच्या शोधात कुठे खोलवर जाण्याची गरज नाही. कारण ती उत्तर आपल्या रोजच्या जगण्याच्या व्यवहारात सहज आपल्याला सापडू शकतात.             ...

'अजून अशा किती निर्भया..? - किरण चव्हाण.

इमेज
           'उत्तरप्रदेशातील हाथरसमध्ये आज पुन्हा माणुसकीला काळीमा फासणारी  घटना घडली...? राक्षसांनी पुन्हा एकदा डाव साधला...वासनांध भुकेने आणखीन एका निष्पाप जीवाचा घास घेतला...'                   'अजून अशा किती निर्भया..?' परवा दिल्ली,काल कोपर्डी, प्रियांका रेड्डी,हिंगणघाट आणि आता हाथरस... 'अजून अशा किती निर्भया..?' नाही ना थांबला हा अत्याचार.. आपल्या समाजातील नाही ना बदलल हे चित्र.... अजूनही घडतायेत राजरोसपणे बलात्कारी घटनांचे सत्र... दिल्लीत घडल्या त्या घटनेने गल्लीपर्यंत हादरलो होतो आपण.. आणि मग गल्लीपासून दिल्लीपर्यंत किती केली होती आंदोलने आपण..? किती पेटल्या मेणबत्त्या श्रद्धांजलीसाठी...? किती केला आकांडतांडव..? त्यावेळी...आजही...अजूनही करतोय आम्हीं. पण नाही थांबवू शकत...नाही संपवू शकत... समाजातील ही वृत्ती अघोरी.. निर्भयासारखीच पुनरावृत्ती घडतेय आमच्या डोळ्यामाघारी.. सोसणाऱ्या अशा किती निर्भया जगताहेत मरणयातना घेऊन भयाप्रमाणे... आणि भोगणारे मात्र निर्लज्ज नराधम फिरताहेत उजळ माथ्याने आणि जगताहेत नि...

कर्तव्यदक्ष, दमदार व कसदार अधिकारी.' प्रांताधिकारी डॉ.संपत खिलारी साहेब .

इमेज
'प्रांताधिकारी डॉ.संपत खिलारी प्रशासनातले कर्तव्यदक्ष, दमदार व कसदार अधिकारी.'             पुणे जिल्ह्यातील आणि जुन्नर तालुक्यातील मंगळूर हे एक छोटंसं खेडेगाव.या छोटयाशा गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात डॉ.संपत कोंडाजी खिलारी यांचा ५ सप्टेंबर १९७५ साली जन्म झाला.आई वडील दोघेही अशिक्षित.पण म्हणतात ना 'शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी.' तसे  आपल्या तीन भावंडांमध्ये हे शेंडेफळ.घरामध्ये वारकरी संप्रदायाचा वारसा.त्यामुळे अध्यात्माचे संस्कार लहानापासून मनावर बिंबलेले.प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मंगळूर या शाळेत झाले.उपजत हुशारपणा आणि कुशाग्र बुद्धिमता असल्यामुळे.इ ७ वी स्कॉलरशिप परीक्षेत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत १८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.आणि इथेच पुढच्या यशस्वी कार्यकिर्तीचा पाया रचला गेला.पुढचे माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी हायस्कुल पारगाव येथे झाले.व त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण मेनन कॉलेज भांडुप मुंबई येथे पूर्ण केले.त्याचबरोबर मुंबई येथे राहूनच मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात एम.व्ही. एससी.(पशुपोषण) शास्त्रात आपले पदवीचे शिक्षण पूर्ण क...

'सर्वगुणसंपन्न सर्वांगसुंदर व्यक्तिमत्त्व : गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी.'

इमेज
'सर्वगुणसंपन्न सर्वांगसुंदर व्यक्तिमत्त्व : आदरणीय गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी.'                                          सांगली जिल्ह्यातील विटा शहराजवळच्या माहुली या छोट्याशा गावी श्री.दत्ताजीराव भाऊसाहेब देशमुख व सौ.विजयालक्ष्मी दत्ताजीराव देशमुख या पुण्यशील दाम्पत्याच्या पोटी आठ लेकरं जन्मली.म्हणतात ना..."शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी." तशी ही लेकरं. आणि त्यातले रसाळ गोमटे शेंडेफळ म्हणजे परमपूज्य गुरुवर्य इंद्रजीत देशमुख (काकाजी) ऊर्फ वासुदेवानंद सरस्वती.काकाजींना तीन भाऊ व पाच बहिणी अशी एकूण आठ भावंडे. एकंदरीत मोठा परिवार.१९ ऑक्टोबर १९६५ रोजीचा काकाजींचा जन्म..आज सर्व आबालवृद्ध आदराने व मायेने त्यांना काकाजी म्हणून संबोधतात..आई विजयालक्ष्मी देशमुख जुनी अकरावी पास असलेल्या तर वडील श्री दत्ताजीराव भाऊसाहेब देशमुख १० वर्षे आमदार होते.मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून प्रथम ज्या दोन आमदारांनी त्यावेळी राजीनामा दिला,त्यापैकी एक काकांजीचे वडील होते.काकाजींच्या वडिला...

सागर गुरव – समाजसेवेच्या जिद्दीच्या जीवनकथेवर आधारित प्रेरणादायी पुस्तक

इमेज
'सागर गुरव म्हणजे  समाजसेवेला वाहून घेतलेलं एक जीवन...'                          भुदरगड तालुक्यातील कोळवण हे थोडं दुर्गमचं म्हणावं लागेल असं गांव...जेमतेम दोन हजाराच्या घरात असलेली लोकसंख्या...शेती हा प्रमुख तर त्याच्या जोडीला पशुपालन हा जोडव्यवसाय.. अशा या खेडेगावात...सागर गुरव यांचा अतिशय गरीब कुटुंबात जन्म झाला...आईवडील शेतमजूर...घरची फक्त पाच गुंठे जमीन...कुठे तरी मोलमजुरी केल्याशिवाय भागायचे नाही...हातावरचे पोट... आणि त्यात ही तीन मुले पोटाला...सागरजींना तीन भावंडे...थोरली बहीण...भाऊ मग सागरजी...बहीण लग्न होऊन सासरी गेली...भावाचे लग्न झाले...कालांतराने...त्यावेळी सागरजी दहावीला असतील... भावाने आपला वेगळा संसार थाटला...आपला सख्खा भाऊ आपल्यापासून दूर गेल्याची बोच त्यांच्या लहान मनाला लागली...घरचा कर्ता पुरुष म्हणून ज्या भावाने कुटूंबाची  जबाबदारी स्वीकारायची...तोच आपली जबाबदारी झटकून मोकळा झाला...पुढे आणखीन एक दोन वर्षाने सागरजींना असाच धक्का बसला...१२ वी ला असताना वडिलांचे डोळे गेले...दोन्हीं डोळ्यांनी ...

अंध प्रल्हाद – नववर्षाच्या कॅलेंडरातून उभा राहिलेला संघर्ष

इमेज
'नववर्षाचे एक कॅलेंडर घेऊन अंध प्रल्हादच्या संघर्षाला बळ देऊ शकता.'                                      वर्षाच्या सरतेशेवटी शहरातून,बाजारपेठेतुन अथवा एखाद्या गल्लीतून अंध व्यक्ती एका हातात काठी व दुसऱ्या आडव्या हातावर कॅलेंडरांची उळी घेऊन फिरत असताना आपल्याला दिसतात.आणि मग संवेदनशील माणसांची आपसूकच पावले त्यांच्याकडील कॅलेंडर विकत घेण्यासाठी वळतात.खरं तर अंध व्यक्तींचे असे कष्ट आणि मुळात त्यांच्याविषयी वाटणारी सहानुभूती यामुळे त्यांच्याकडील कॅलेंडरचा खप होतो ही एक जमेची बाजू आहे...                   प्रल्हाद दत्तू पाटील ही अशीच एक अंध तरुण व्यक्ती.अंदाजे चाळीसपर्यंत असणारे वय.पाचगांव येथे विरविनायक कॉलनीत महिला मंडळ गिरणीजवळ राहतात.जन्मतः अंधत्व असलेलं. रोज उगवणारा सूर्य त्यांच्या आयुष्यात अंधार घेऊन येतो.लहान असताना त्याांच्या वडिलांनी आई व या मुलाला सोडून दिले.आणि मग या तान्ह्या लेकराला उराशी कवटाळून आई माहेरी पाचगावमध्ये येऊन राहिली.आई म्हैशी ...