पोस्ट्स

बालकविता - चांदोमामा चांदोमामा - किरण चव्हाण.

इमेज
  "चांदोमामा चांदोमामा..." चांदोमामा चांदोमामा या ना एकदा घरी रोज वाट पाहतो मी उभे राहून दारी. चांदण्यांना घेऊन या हं तुमच्या बरोबरी गप्पा मारू मिळून सारे मज्जा येईल भारी छान छान गोष्टी सांगा ऐकू आम्हीं सारी जराशीही चुळबूळ  करणार नाही. नाचू गाऊ मिळून आपण धमाल मस्ती करू तुम्हींच किती फिराल आम्हीं तुमच्या भोवती फिरू. खुप खेळून दमून भागून थोडी विश्रांती घेऊ हवं तर मग पुन्हां  आपण शिवपाट्या खेळू तुमच्यासाठी आई बनवेल  तुप रोटी मऊ अंगणात बसून आपण  सारे पोटभर खाऊ. मग शेवटी सांगा तुम्हीं कशा बदलता हो कला हळूहळू छोटे कधी मोठे  होता कळत नाही मला आकाशातले घर तुमचे आहे तरी कोठे..? फिरायाला अंगणही असेल किती मोठे.. खूप काही बोलायचंय  एवढं मनावरती घ्या ना. नका आता उशीर करू तुम्हीं भेटायाला या ना..    चांदोमामा  बघा हं  मी तुमची वाट पाहेन नाही आला तर तुमच्याशी 'गट्टी फू' चं करेन याल ना हो चांदोमामा  तुम्हीं माझ्या घरी. सोडेन ना हो  तुम्हाला  मी नक्की वेळेवरी.

आजी सोनियाचा दिनु - काकाजींचा जन्मदिन विषेश.

इमेज
                           🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 गुरुवर्य आदरणीय इंद्रजीत देशमुख काकांजीचा जन्मदिन... 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 "अद्वैताचं लेणं करू शब्दसुमानांनी लिंबलोण" 🌸🌸🌺🌺🌼🌼🌹🌹🌼🌼🌷🌷🌸🌺🌻🌺 इं - द्रायणीच्या काठचा ज्ञाना वदतो आपल्या मुखातूनी.. ज्ञानामृताने ओंथबती शब्दे पाझरती हृदयातूनी द्र - वती पाषाणहृदयेही आपुल्या शीतल वाणीने धन्य होती वाणी वर्षावात भिजूनी प्रत्येक तने-मने. जी - वा सवे जीव जडण्या मायेचा धागा गुंफती आपुली वचने. चांगुलपणाच्या सुवासाने दरवळतात इथे सुमने.. त - याजयांच्या सुखाचा ध्यास अखंड आपुल्या हृदयांतळी अवघ्यांच्या कल्याणाचे साकार करावया स्वप्ने आपुला जिवात्मा तळमळी.                       बापा...कंचे शब्द आपल्या चरणावरी घालावे...कंच्या शब्दांचा सेतू बांधावा आपुल्या पवित्र हृदयी भेटीसाठी... पण इथे का म्हणोनि शब्दांवरी भार घालावा...की जे... 'आपणची ठावें आपणासी' आपला ठाव आमच्या हृदयी विराजितआहे.. शब्देविन संवादीजे... बापा आपल्याशी संव...

'मृत्युंजया कोमलदीदी...' - किरण चव्हाण.

इमेज
                    'मृत्युंजया कोमलदीदी...' काल तर आमच्यात होतीस आणि आज अशी अचानक आम्हांला सोडून गेलीस.? नाही अजूनही विश्वास बसत.. वादळवाऱ्याशी झुंजणारी पणती अखेर विझली..? कालपर्यंत तर तेवत होती ना...उजळवत होती आपला भोवताल... किती निखळ, निरागस, स्वछंदीपणे लखाखत होती... मृत्यूच्या काळ्या छायेत दडलेल्या.. चाचपडणाऱ्या जीवाला जगण्याचा प्रकाश दाखवत होती... असहाय्य वेदनेने विव्हळणाऱ्या जीवांच्या जखमेवर फुंकर घालत होती. नियतीने किती छळलं ना तुला..?  किती यातना.. वेदना दिल्या.. तरी सगळं सहन करीत राहिलीस. कधी हार मानली नाहीस, डगमगली नाहीस..  लढत राहिलीस धीरोदात्तपणे. जगण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीने अखेर मृत्यूवर मात केलीस आणि तू झालीस मृत्युंजया.. जगता जगता अनेकांना  जगण्याची प्रेरणा देत राहिलीस.. जीवनप्रेरणा बनून गेलीस. किती भरभरून जीवन जगत होतीस. प्रत्येक क्षणांचा आनंद लुटत होतीस. ज्याने तुला अवयवदान केले... ज्यांच्यामुळे तुला जीवदान मिळाले. त्यांना क्षणाक्षणाला धन्यवाद देत राहिलीस.. अवयवदानाचे कार्य हे तर तुझ्या जीवनाचे ध्येय बनू...

बालकविता- :'चंपू आणि ससोबा.' - किरण चव्हाण.

इमेज
 'चंपू आणि ससोबा.' एक होता चंपू त्याचा मित्र गंपू मारत होते गप्पा  चंपू  आणि गंपू चंपू बोलत होता आणि गंपू ऐकत होता काय बरे चंपू गंपूला सांगत होता..? रात्री म्हणे एक पडले होते स्वप्न चंपूच्या स्वप्नामध्ये आले बरे कोण..? दिसत होते मला हिरवे हिरवे रान रानावरती आले सशाचे पिल्लू छान गुबगुबीत त्याचे इवलेसे अंग अंगावरच्या केसांना पांढुरका रंग येऊन माझ्या जवळी म्हणतो कसा मला चंपूदादा तुम्हीं माझ्या घरी चला मग गेलो ना हो मीही मागून त्याच्या घरी गाजरांची बाग होती परसात भारी. ससोबाने मला खायाला दिले गाजर तेवढ्यात त्याचे आईबाबा झाले हजर. ससोबाच्या संगे मी खुप खेळलो भारी. फिरायला गेलो आम्हीं जंगलात दुपारी कुठून कशी ऐकू आली वाघाची डरकाळी माझी तर पार बोबडी वळाली. ससोबा गेले पळून मला रडू आले तेवढ्यात मला आईने जागे केले.

'कोरोना विरुद्धची लढाई जिंकायचीय आपण.' - किरण चव्हाण.

इमेज
✊ कोरोना विरुद्धची लढाई जिंकायचीय आपण.'✊                                                                                                 कोरोना...कोरोना...कोरोना... ऐकावं...पहावं...बोलावं असं सर्वकाही व्यापून ठेवलं आहे कोरोनानं...आज संपूर्ण जगभरात या विषाणूनं थैमान घातलय... अखंड मानवजातीला हैराण करून सोडलंय..एखाद्या दुरदेशात ज्याची उत्पत्ती व्हावी आणि बघ ता बघता आपला देश.. राज्य...शहर..गाव आणि घरापर्यंत मजल मारावी..याचाचं अर्थ आज त्यानं कोणत्याच सीमा मागे ठेवलेल्या नाहीत.. मानवी शरीर हे त्याचं आश्रयस्थान.. माणूस हा त्याचा वाहक.. माणसाकडून माणसाकडे संक्रमण करीत सुरू असलेला त्याचा सर्वव्यापी प्रवास...माणसामाणसांची शृंखला जोडून त्याने आज जगभर आपलं जाळं विणलय. संपूर्ण जग  व्यापलंय.  आणि कोरोना नावाच्या या अदृश्य विषाणूने जणू माणसांविरुद्ध युद्ध ...

कोरोना योध्या रणरागिणी आशा व अंगणवाडी सेविका....- किरण चव्हाण.

इमेज
कोरोना योध्या रणरागिणी आशा व अंगणवाडी सेविका.... "मामा...मावशी...दादा...ताई कोण आहे का घरात.?." "या बाहेर...या..." "चला हात पुढं करा...थोडे लांब उभे रहा..." "मावशी...ऑक्सिजन चांगला दाखवतोय तुमचा ..टेम्प्रेचरही चांगलं आहे.." "आज्जीबाई तुमचं ऑक्सिजन कमी दाखवतोय..". "काय त्रास होतोय..?" "कुणाला काही.. बी.पी..शुगरचा त्रास..? "घरात कोणाला थंडी- ताप, सर्दी-खोकला..." "कुणाला काही त्रास..असेल तर सांगा...दवाखान्यात दाखवून स्वॅब तपासून घ्या." "घराबाहेर पडताना नेहमी मास्कचा वापर करायचा.." "वरचेवर साबणाने हात धुवायचे किंवा सॅनिटायजर वापरायचे... कारण नसताना घराबाहेर पडायचं नाही....अशक्तपणा वाटत असेल तर लिंबूपाणी प्यायचे.." "आणि हो कोरोनाला घाबरायचं नाही पण काळजी घ्यायची आपली व आपल्या माणसांची...कळलं का...?" हे काळजीवाहू बोल आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ऐकायला मिळतील...प्रत्येक गाव,शहर गल्लीबोळ, अगदी सांदीखोपड्यातल्या प्रत्येक घरासमोर जाऊन कोविड सर्वेक्षण करणाऱ्या या आहेत आपल्या आशा ...

गावकुसातील कथा - 'तानी' - किरण चव्हाण.

इमेज
 'तानी...'                                                                वरल्या आंगच्या तोंडानं पाऊस मजबूत झोडपत व्हता.रानाशिवारात नुसता हैदोस घातल्याला.जमिनीला जरासुदीक पाणी थरत नव्हतं का निसरडीला धावणाऱ्या लाल पाण्याला दम व्हता. शेतवडीतनं तुंबून बांधाच्या साण्यातन पाण्याचा मुसोंडा खाली उतरीता..बारीक मोठ्या चिवळाटातनं पाणी बेलगाम दौडत,जवळच्या वड्या वताडाला मिळत व्हतं...वड्या वताडातलं गदुळ पाणी उर भरून खायल्या आंगाला सपाट्यानं धावतं.हिरव्या लुसलुशीत रान कुरणाच्या उरावर वरनं रापराप थेंबका आदळालता...आंगचा पाझर फुटावा तसं एकेक दगुडधोंडा वरनं खाल पाझरत व्हता.आंघोळीचं पाणी आंगवळण घित खालपतोर नितळावं तसं झाडीझुडीच्या उभ्या आंगावरनं नितळ पाणी बुडाला धाव घीतं.                                        धुळणीच्या माळावरची धोंड पिंडीवर जलध...