अभंगवाणी - पांडुरंगा...- किरण चव्हाण.

 

'पांडुरंगा...'


तूच पांडुरंगा निवारी हा काळ । 

राहिले न बळ अंगी आता  ।। 


चित्त नाही चित्ती जीव जीवापाशी। 

काय माझी स्थिती सांगू तुज  ।। 


मुक्यापरी मन सोसतची जाय । 

 किती हे सायास सहावे मी  ।। 


सुखाचे कारणी दुःखाचा हा भोग ।

 नाही उपभोग मज घ्यावयाचा ।। 


    सोसवेना आता दे गा तू आधार ।   

टाकीतो मी भार तुजवरी ।। 


नको ऐसें जिणे देऊ मज देवा । 

नाही आता हेवा जीवनाचा  ।। 


पुरे झाली आस नको आता वास । 

तुच माझा श्वास पांडुरंगा  ।। 


काय उरे आता इथे माझेपण । 

देई मज ठाव तुजपाशी  ।।


 

टिप्पण्या

  1. सर अप्रतिम अशी मनाला विठूरायांची ओढ लावणारी रचना
    वाटली.आणि वास्तवतेची मागणी विठूरायाकडे आपण केली
    आहे.सुंदर रचना आहे.
    -------ज.रा.देशमुख

    उत्तर द्याहटवा
  2. Very nice sir..... Agadi sopya ani saral bhashemadhe rachana kelit.Sundar....�

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"सोशल मीडिया आणि विद्यार्थी: फायदे, तोटे आणि काळजी घेण्याचे मार्ग"

भारताची जलतरणपटू कांचनमाला पांडे-देशमुख- किरण चव्हाण.

'सर्वगुणसंपन्न सर्वांगसुंदर व्यक्तिमत्त्व : गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी.'