कविता - सरकारीच पाहिजे. - किरण चव्हाण.

आजच्या काळात जेंव्हा मुलगा मुलगी पहायला जातो तेंव्हा सहाजीकच मुलगीच्या घरच्या अपेक्षा वाढलेल्या दिसून येतात... आणि त्यामध्ये एक अपेक्षा असतेचं असते ती म्हणजे मुलगा सरकारी नोकरीला असला पाहिजे...ही अपेक्षा असणं वाईट नाही पण याचा अर्थ असाही नाही नोकरीलाचं प्राधान्य देताना की तो मुलगा कसा आहे..? याला आपण दुय्यम स्थान द्यावं...त्यावर आधारित ही रचना... .... सरकारीच पाहिजे. आवं पावणं पोरगं निरोगी,निर्व्यसनी हाय. चांगलं धट्टा-कट्टा,धडपडी,हरहुन्नरी हाय.... पावणं ते काय न्हाय... पोरगं सरकारीच पायजे हाय. पावणं...पोरगं चांगलं शिकल्यालं हाय,सुशिक्षितबी हाय.. पण एवढंच काय,जरा खाजगी नोकरीला हाय. पावणं ते काय न्हाय... पोरगं सरकारीचं पायजे हाय. प्रामाणिक हाय हं...पोरगं. चांगल्या विचारांचं हाय. लई चांगल्या गुणांचं, माणुसकीला धरून हाय. पावणं ते काय न्हाय... पोरगं सरकारीचं पायजे हाय. बरं... पोरगं उद्योगी हाय..चांगला पैसा कमावणारा हाय... घरदार बघितला तर सगळं जिथल्या तिथं हाय. पावणं ते काय न्हाय... पोरगं सरकारीचं पायजे ह...