पोस्ट्स

सावित्रीच्या लेकी आज स्वतंत्र आहे का लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सावित्रीच्या लेकी आज स्वतंत्र आहेत का..

🌸 सावित्रीच्या लेकी स्वतंत्र आहेत का? – स्त्री स्वातंत्र्याचा विचार 🌸

इमेज
🌸 सावित्रीच्या लेकी स्वतंत्र आहेत का? 🌸   सावित्रीच्या लेकी आज स्वतंत्र आहेत का..?             महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज,समाजसुधारणेसाठी  शिक्षणाची धारणा जनमाणसात रुजवणारे महात्मा फुले, स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, समाजात न्याय,समता प्रस्थापित करणारे शाहू महाराज, दीन दलितांचे कैवारी आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रथमतः या विभूतींना वंदन करते तसेच या व्यासपीठावरील ज्ञानवंत,प्रज्ञावंत मान्यवर, सुज्ञ परिक्षक आणि हे विचारमोती टिपण्यासाठी बसलेले श्रोतेजन आपणा सर्वांना नमस्कार करून  आपल्यासमोर विषय मांडते आहे...सावित्रीच्या लेकी आज स्वतंत्र आहे का..?             सुरुवातीलाच मी सांगू इच्छिते की, परवाची एक घटना आहे मनीषा पाटील नावाची शूर नारी भारतीय सैन्यात बी.एस.एफ मध्ये कार्यरत आहे. परवा आपल्या दहा महिन्याच्या बाळाला घरी ठेऊन देशाच्या सीमेवर रक्षण करण्यासाठी गेली..?  म्हणजे आजची स्त्री देशाच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेत ...