पोस्ट्स

श्री. अशोक चव्हाण यांचा डाक विभागाकडून सन्मान.

इमेज
                डाक सेवेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री.अशोक राजाराम चव्हाण यांचा डाक विभागाकडून उचित सन्मान.                    केंद्र सरकारच्या डाक विभागामध्ये 1991 पासून गेली 30 वर्षे कार्यरत असणारे व कर्तव्यनिष्ठ राहून प्रामाणिकपणे पोस्ट सेवा बजावणारे शांत,संयमी आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व,पांगिरे गावचे सुपुत्र आणि आमचे दादाश्री श्री. अशोक राजाराम चव्हाण यांना डाक विभागातल्या उत्कृष्ठ सेवा कामगिरीबद्दल 'Best Employee Of the year' या पुरस्काराने मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. सध्या ते पोस्ट मास्तर या पदावर कार्यरत आहेत.आपल्या सेवेला वाहून घेऊन एकनिष्ठपणे शांततेने आपले कार्य करीत राहणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे.खरं तर आपल्या कामाशी एकरूप राहून तन्मयतेने काम करण्याचा एक आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. अशा उल्लेखनीय सेवा कार्याची दखल घेऊन त्यांचा झालेला सन्मान हा उचित असा आहेच, त्याचसोबत  सर्वांसाठी आदर्शवत असणारा व प्रेरणादायी ठरणारा आहे.आपल्या सर्वांच्यासाठी ही आनंदा...

विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तकाच्या अनुषंगाने...

इमेज
 विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तकाच्या अनुषंगाने...                           आजच्या शिक्षणक्षेत्रातील विदारक सत्य असलेल्या  विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षावर आधारित 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दि.२१ ऑक्टोबर २०२१ रोजी शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते पुणे शिक्षक मतदार संघाचे विद्यमान शिक्षक आमदार जयंत आसगावर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पार पडला.                           आजच्या शिक्षणक्षेत्रातील विदारक सत्य असलेल्या 'विनाअनुदानित' ह्या ज्वलंत विषयावर आणि २० वर्षांपासून हक्काच्या अनुदानासाठी लढणाऱ्या,झगडणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षावर आधारित 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकाच्या अनुषंगाने हा शब्दप्रपंच. खरं तर मी जरी एक विनाअनुदानित शिक्षक असलो तरी जेंव्हा एक माणूस म्हणून मी या प्रश्नाकडे पाहतो. त्यावेळीे मला प्रकर्षाने जाणवतं की, 'विनाअनुदानितचा संघर्ष हा एका विनाअनुदानित शिक्षकाचा संघ...

मदतीचा हात मायलेकीच्या निवाऱ्यासाठी

इमेज
  ' मायलेकीसाठी निवारा उभा करूया संकल्पसिद्धीचे साक्षीदार होऊया.'                                                    भुदरगड तालुक्यातील मिणचे बुद्रुक येथे श्रीमती रेखा धोंडीराम परीट व प्रगती धोंडीराम परीट या दोघी मायलेकी राहतात. गल्लीतल्या एका वळणावरच्या कोपऱ्यात विठ्ठल मंदिराच्या उजव्या बाजूला एक छोटेखानी मातीचे घर आहे.घराला कांबटाचं दार.आत जाताना वाकून जावं लागतं.हे घर म्हणजे दाटीवाटीचा खोपडाचं म्हणायचा.दोन चार लोकांना बसायलाही पुरेशी जागा नाही.. घरात पूर्ण अंधार प्रकाशाची सोय नाही.रात्रीचा दिवा लावावा म्हटलं तरी त्या दिव्यात रॉकेल कुठून आणणार..? कारण रॉकेल आणायचं तर रेशन कार्ड पाहिजे.एकंदरीत स्वतःच्या मालकी हक्काची जमीन नाही,राहतं घर ते ही नावावर नाही,मूळ कागदपत्रे नसल्याने रेशनकार्ड,आधारकार्ड (आईचे नाही) सारखी महत्वाची कागदपत्रे उपलब्ध होत नाहीत.त्यामुळे गरिबीची वास्तवता कागदोपत्री सिद्ध होत नसल्याने शासनाच्या सोयीसुविधापासून आज वंचित रहावं लागत आहे....

"बा मेघराजा...मी एक पूरग्रस्त बोलतोय."

इमेज
                  "बा मेघराजा...मी एक पूरग्रस्त बोलतोय."                      आसमानी सरी बरसतात काळ बनून आणि अंदाधुंद तांडव करून जातोस मेघराजा.तुझ्या जीवावर प्रजा सुखात आनंदात नांदते...त्या प्रजेचं अतोनात हाल करून छळून..लुटून जातोस बिचाऱ्या.बा मेघराजा एवढा कसा काय रे निष्ठुर होतोस..? जो प्रेमानं धरणीमायेवर बरसावा तो असा कोपिष्ट होऊन का खवळवतो.बरसायला लागलास की बरसत राहतोस नुसता वेड्यासारखा.. तुझं तुलाही नाही भान रहात.व्यापून टाकतोस धरणीमायेच्या सर्वांगाला.तिच्या लेकरांनी तिच्या कुठल्या कुशीत लपून बसावं रे? जराही ठाव नाहीस देत. काय बोलावं आणि कुणापाशी बोलावं..? तुला वाईट तरी कसं म्हणावं..? तारणारा तूच आणि मारणाराही तूच.एका हातानं देणारा तूच अन दुसऱ्या हातानं असं काढून घेणाराही तूच.                          तूच आहेस डोळ्यात प्राण आणून ज्याची आंम्ही वाट पाहतो...तू बरसायला लागलास की,आमच्या आनंदाला उधाण येतं.सुखस्वप्नं पहावी ती त...

विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तकाच्या अनुषंगाने.

इमेज
  'विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तकाच्या अनुषंगाने...'                          गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी आणि आपापल्या क्षेत्रात उत्तुंग उंची गाठलेली कर्तृत्ववान मंडळी या ग्रुपमध्ये सहभागी आहेत.त्या सर्वांना माझा प्रथमतः नमस्कार. मी आपणा सर्वांचे आभार मानतो की,आपण सर्वजण शिक्षणक्षेत्रातील 'विनाअनुदानित' या  विषयावर नजीकच्या काळात येणाऱ्या 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकासाठी सहभागी झाला आहात.या अनुषंगाने हा ग्रुप स्थापित करताना आतापर्यंत ग्रुपवर पुस्तकाची नोंदणी,माहिती व चर्चा होत राहिली..अशा उद्देशासह हा ग्रुप स्थापण्यामागचा मूळ उद्देश प्रामुख्याने आणखीन स्पष्टपणे उघड झाला पाहिजे असं मला वाटतं. गेली दोन महिन्यापासून माझे जिवलग सहकारी बंधू मनापासून पुस्तकाचा उद्देश ,हेतू सर्वांपर्यंत पोहोचावा याकरिता धडपडत आहेत.दरम्यान ही वाटचाल करताना सध्याच्या कोरोना महामारीचेही गडद सावट आहेचं.याची आम्हांला पूर्णपणे जाणीव आहे.ग्रुपचा प्रतिसाद लक्षात घेऊन शिक्षण, साहित्य, कला,सांस्कृतिक, सामाजिक ,प्रशासकीय अशा विविध क्ष...

कविता - भूक. -किरण चव्हाण.

इमेज
                                    भूक. तिच्या दोनचार पैशांच्या वाटीचा तो खडखडाट प्रत्येकजण ऐकत होता. पण तिला ना कुणाला त्याच काहीही वाटत नव्हतं. कोवळ्या हातातील तो भला कितीदा ती न्याहाळायची. आणि तसाच एकेक रुपया ती झोळीमध्ये टाकून द्यायची. मुठीमधल्या त्या पैशांची गणितं तिला अजिबात मांडता येत नव्हती. गोल बंद्या रुपयाशी ती फक्त खेळत असायची. कोवळे गोबरे गाल,मऊशार ओठ किती सुदंर दिसत होती. चमकणाऱ्या सोनेरी केसांची वेणी पण पार विस्कटून गेली होती. सजली धजली असती तर गोडशी परीच शोभली असती पण कुणाचं ठाऊक ती अशी असूनही ती तशी का दिसत नव्हती. खेळण्या बागडण्याचं वय पण खांद्याला झोळी अडकलेली पाणीदार डोळ्यातील तिची नजर सतत कुणाला तरी न्याहाळणारी. माणसांच्या मागे धावून ती अनेकदा थकून जायची. पण येणाजाणाऱ्यांच्या पुढे ती पुन्हां पुन्हां हात पसरायची. वाटीत पडणारा एकेक पैसा पाहून ती खूप आनंदीत व्हायची आणि आनंदाच्या भरात वाटीमधला पैसा ती हवेत उडवायची. लोकांनी तिच्या वाटीत टाकलेला एकेक पैसा म्हणजे तिला घातलेली भीक होती...

सजा-ए मौत -किरण चव्हाण.

इमेज
  'पुलवामा में हमारे वीर जवानों पर उन गद्दारों ने पीठ पीछे हमला किया और बड़ी संख्या में हमारे वीर जवान शहीद हो गए उन शहीद जवानों के भावपूर्ण आदरांजली और उनके प्रति ये रचना समर्पित..'  ' सजा-ए -मौत' ए दहशतवादी गद्दार साले पीठ पीछे  वार करते है | अरे हमारे मुल्क में मच्छर भी सामने से काटते है |  कैसे कहूँ दुर्भाग्य है उस धरती का जिसमे पैदा हुई ऐसी जिंदा लाशें | हमारे गटर में पैदा हुए किडे-मकोडे भी है तुमसे बेहतर | तुम जिंदा मुर्दों की बात क्या करें,  तुम तो मानव जाती पर कलंक हो | क्या औकात हैं तुम्हारी ? कभी पूछो अपने जन्म देने वाली माँ को,  शरम आती होगी, पछताई होगी अपने आप पर  जो पैदा हुआ ऐसा पाप अपनी कोकसें | किसी कोने में छीपकर हमें धमकाने वाले..नहीं हम कुछ नहीं कहेंगे | क्योंकी तुम्हे मालूम है,खुद अपने आपको तुम हो डरपोक  अपनी दुम टांगो में लेकर किसी आडसे भौंकनेवाले... अरे हमारे घर के पालतू कुत्तेभी ईमानदारीसे जीते हैं और सामनेसे भौंकते हैं | सामने आने की हिम्मत नही होती इसलिए पीछे से आते हो बार बार,  पीठ पर वार करने की आदतें हैं तुम्हारी नाम...