श्री. अशोक चव्हाण यांचा डाक विभागाकडून सन्मान.

               


डाक सेवेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री.अशोक राजाराम चव्हाण यांचा डाक विभागाकडून उचित सन्मान.

                   केंद्र सरकारच्या डाक विभागामध्ये 1991 पासून गेली 30 वर्षे कार्यरत असणारे व कर्तव्यनिष्ठ राहून प्रामाणिकपणे पोस्ट सेवा बजावणारे शांत,संयमी आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व,पांगिरे गावचे सुपुत्र आणि आमचे दादाश्री श्री. अशोक राजाराम चव्हाण यांना डाक विभागातल्या उत्कृष्ठ सेवा कामगिरीबद्दल 'Best Employee Of the year' या पुरस्काराने मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. सध्या ते पोस्ट मास्तर या पदावर कार्यरत आहेत.आपल्या सेवेला वाहून घेऊन एकनिष्ठपणे शांततेने आपले कार्य करीत राहणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे.खरं तर आपल्या कामाशी एकरूप राहून तन्मयतेने काम करण्याचा एक आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. अशा उल्लेखनीय सेवा कार्याची दखल घेऊन त्यांचा झालेला सन्मान हा उचित असा आहेच, त्याचसोबत  सर्वांसाठी आदर्शवत असणारा व प्रेरणादायी ठरणारा आहे.आपल्या सर्वांच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे.पुनश्च त्यांच्या यशस्वी गौरवास्पद कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा...         




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक दिनीच घेतला अखेरचा श्वास... विनाअनुदानित शिक्षक किशोर पाटील यांचा करुण अंत | १५ वर्षांची अध्यापनाची नि:स्वार्थ सेवा करून शेवटपर्यंत पगार मिळाला नाही.

'सर्वगुणसंपन्न सर्वांगसुंदर व्यक्तिमत्त्व : गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी.'

"सोशल मीडिया आणि विद्यार्थी: फायदे, तोटे आणि काळजी घेण्याचे मार्ग"