पोस्ट्स

"Childhood Games and Village Memories: Traditional Play in Rural Life"

इमेज
  Kiran Chavan This blog of mine is related to my writing. Friday, September 29, 2023 A story of a cricket team.   "Go ahead, what are you afraid of, who are you worried about..."             ?  But having said that it takes all this...what to do now..?  Who says it's like having a whole load of lightning on your body... wear it and start running in the field...                                What used to happen in our time... we used to remove the baton from the garden and someone would prepare the bat for an hour.. when the baton went 'N', our bat was ready... the boys started going to the villages... if we cut the rice in the village, then the field is our right... the matter of rice. Yegali... now it is going on.... so... when did our boys wear this kit.... our village boys... on the open floor... hey$$ it's the army of monkeys who play with open arms. .....

"गावातील मुलांचा क्रिकेट प्रवास: तालुका ते जिल्हास्तरीय स्पर्धा"

इमेज
    "तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची,पर्वाबी कुणाची..."             नमस्कार मंडळी... आता आपल्या गावची पोरं जातील बघा जिल्ह्याला क्रिकेट खेळाया...तालुकापातळीवर क्रिकेट स्पर्धेमधी आपल्या माध्यमिक विद्यालय आरदाळ शाळेच्या पठ्ठयांनी तालुक्यात पयला नंबर पटकावला नी आपल्या संघाची जिल्ह्यासाठी निवड झाली...माहिती आसलंच नव्ह तुमास्नी.. हे सगळं इथपर्यंत ठीक व्हतं.. पण जिल्ह्याला जायचं म्हंजी...जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा लेदर बॉलवरती आसतीया म्हंत्यात..पण आमची पोरं कवा खेळल्यात लेदर आणि बिदर वरती...आता लेदर बॉलवर खेळायचं म्हंजी सुरक्षेसाठी सगळं सामान लागतंय... डोक्याला हेल्मेट, छातीला पट्ट्या, हातात ग्लोज,पायाला पॅड, हाय फॅड - फाय फॅड...काय काय नवच फॅड आलंय म्हणायचं हे...पायात म्हणं स्टडचं बूट..इथं साधं बूट धड मिळना आणि म्हणं स्टडचं... आता आमच्या पोरास्नी हे फक्त ऐकून आणि बघूनचं माहिती हो.. टी.व्ही मधी वल्डकपच्या आणि आय.पी.एल च्या मॅच बघताना तर आम्हीं हे सगळं बघतोयाच पण कशाला काय म्हंत्यात कुणाला ठावं हाय...? पण हे सगळं लागतंयचं म्हटल्यावर...आता काय कराय...

बाप गेला आणि... "बापाची प्रेरणा: अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल"

इमेज
                                          बाप गेला आणि...                                        आज मी जेंव्हा कधी मुद्दामहून डोळे मिटून, रस्त्याने चालावयाचा प्रयत्न करतो.तेंव्हा दहा पाऊलेही नीट धाडसाने टाकू शकत नाही...मनात भीती वाटते. वाट चुकेल की काय..? मी कुठे भलतीकडेच जाईन का काय..? आणि मग माझे बाबा माझ्या डोळ्यासमोर उभे राहतात..माझा बाबा कसा चालत होता..? माझा बाबा अंधारल्या डोळ्यांनी प्रत्येक पाऊल कसा टाकत होता.?  अंधाऱ्या डोळ्यांनी आयुष्याची लढाई लढणारा माझा बाप खरंच माझ्यासाठी जगातला एक ग्रेट माणूस आहे. ज्या बापाच्या पुढची वाट सदा अंधाराची होती, त्या बापानं मी इवलासा असताना माझं बोट धरून मला शाळेत पाठवलं होतं. कारण त्याला माहित होतं, स्वतःचं आयुष्य जरी अंधारान दाटलं असलं तरी पोराच्या आयुष्यात प्रकाश येईल तो शिक्षणामुळचं. बाबाला माहिती होतं की, पाचवीला पूजलेल्या या गरि...

"शांत, शिस्तप्रिय आणि विद्यार्थिप्रेमी शिक्षक श्री. विनायक पाटील सरांचा सन्मान"

इमेज
  शांत शिस्तप्रिय,मायाळू  विद्यार्थीप्रिय गुरू श्री. विनायक पाटील सर..               काही माणसं शांत, संयमी आणि आपल्या नेमून दिलेल्या कार्याकडे प्रामाणिक पणे वाटचाल करणारी असतात. ती बोलकी नसतीलही पण त्यांचे काम मात्र बोलके असते. त्यांच्या मनाची ऊर्जा, एकाग्रता ही त्यांनी सातत्याने आपल्या कामाप्रतिचं व्यतीत केलेली असते. असेच एक शांत, संयमी,मितभाषी व्यक्तिमत्त्व म्हणजे गुरुवर्य विनायक पाटील सर आज ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत.                    अगदी भर उन्हात स्वतःच सेवानिवृत्त समारंभाची पत्रिका घेऊन सर माझ्या घरी आले.पत्रिका हातात देत आग्रहाचं निमंत्रण दिलं तेंव्हा सहजच माझे हात सरांच्या पायाशी गेले. सरांचे चरणस्पर्श केले. सरांना बसण्याची विनंती केली पण घाईगडबडीत उभ्या उभ्याच सर आमंत्रण देऊन घरातून बाहेर पडले. सर निघून गेले आणि हातात निमंत्रण पत्रिका घेत..न्याहाळू लागलो ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सर सेवानिवृत्त होत आहेत.. त्या ३३ वर्षांच्या कारकिर्दीतील विद्या मंदिर पांगि...

एक चित्तथरारक अनुभव."धाडसी तरुणाचा प्रयत्न: नेट हाऊस वाचवताना गाडी जळून गेली"

इमेज
  एक गाडी उभी करायचीय कारण...                ही गोष्ट आहे एका जिगरबाज तरुणाची आणि पेटलेल्या त्याच्या गाडीची. त्या दुपारच्या चित्तथरारक घटनेचा मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. आज आपण आजूबाजूला पाहतो डोंगराला आग लागण्याचे किंवा मुद्दामहून लावण्याचे प्रकार सर्वत्र दिसून येत आहेत.म्हणजे आग लावतो कोण आणि त्याच्या झळा सोसतो कोण अशी परिस्थिती..   असाच एक भर दुपारचा प्रसंग होता तो. उतुरकडून पिंपळगावच्या दिशेने येताना नवकृष्णा व्हॅली स्कुल जवळचा.कडकडीत उन्हात  खालून डोंगर पेटत येऊन नेट हाऊसच्या खालच्या बांधला असणाऱ्या गवताने पेट घेतला आणि क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. एक तर कडाक्याचे ऊन आणि वारा त्यामुळे आग जलद गतीने पसरत होती. गवत पेटून आगीचे लोळ उठत होते. आणि जवळजवळ ही आग आता त्या नेट हाऊसला लागणार अशीच सगळी परिस्थिती निर्माण झाली होती. पण हातात पाल्याचे डहाळे घेऊन मिळेल ते साधन घेऊन नवकृष्णा व्हॅली स्कुलचे प्राचार्य रामकृष्ण मगदूम आणि त्यांचे सहकारी शिक्षक,कर्मचारी तसेच  रस्त्याने येणारे जाणारे वाटसरू आपली गाडी थांबवून ती आग ...