पोस्ट्स

गावकुसातील कथा - 'तानी' - किरण चव्हाण.

इमेज
 'तानी...'                                                                वरल्या आंगच्या तोंडानं पाऊस मजबूत झोडपत व्हता.रानाशिवारात नुसता हैदोस घातल्याला.जमिनीला जरासुदीक पाणी थरत नव्हतं का निसरडीला धावणाऱ्या लाल पाण्याला दम व्हता. शेतवडीतनं तुंबून बांधाच्या साण्यातन पाण्याचा मुसोंडा खाली उतरीता..बारीक मोठ्या चिवळाटातनं पाणी बेलगाम दौडत,जवळच्या वड्या वताडाला मिळत व्हतं...वड्या वताडातलं गदुळ पाणी उर भरून खायल्या आंगाला सपाट्यानं धावतं.हिरव्या लुसलुशीत रान कुरणाच्या उरावर वरनं रापराप थेंबका आदळालता...आंगचा पाझर फुटावा तसं एकेक दगुडधोंडा वरनं खाल पाझरत व्हता.आंघोळीचं पाणी आंगवळण घित खालपतोर नितळावं तसं झाडीझुडीच्या उभ्या आंगावरनं नितळ पाणी बुडाला धाव घीतं.                                        धुळणीच्या माळावरची धोंड पिंडीवर जलध...

कविता - 'आयुष्याचे कोडे..' - किरण चव्हाण.

इमेज
  'आयुष्याचे कोडे..' भंगू दे आयुष्य माझे जाऊ दे जीवनाला तडे या जगण्याचे का आता थोडेच माझ्यावाचूनी अडे..? माझ्याच आयुष्याचे मजला सुटे ना कोडे... कसे जगावयाचे आणि  कुठे जावयाचे अजुनी..?  मला काही ना कळे..   जळो...जळो हे जिणे लाजिरवाणे.. माझ्यावाचूनी का इथे काय उणे..? माझ्याच आयुष्याचे मजला सुटे ना कोडे... चुकून का आलो असेन  या माणसांच्या झुंडीत. माणूस म्हणून जगताना  का मीच सापडलो खिंडीत.. जगण्याची का एखादी   मला वाट ना सापडे..? माझ्याच आयुष्याचे मजला सुटे ना कोडे... पोट भरल्या दुनियेचे  नुसते ऐकावे मी ढेकर.. भूक भागल्या पोटाचे  मीे सोंग घ्यावे कुठंवर. भरले पोट दावितो  पण आतून आतडे कोरडे... माझ्याच आयुष्याचे मजला सुटे ना कोडे... खरे आसू लपवितो  आणि खोटे हासू दावितो. दुःखं भरल्या चेहऱ्यावर मी  आनंदी मुखवटा चढवितो. प्रसन्न वाटतसे माझे मन  पण आतून किती कितींदा रडे... माझ्याच आयुष्याचे मजला सुटे ना कोडे...  जगण्यासाठी मला का  इथे कशाची गरज पडे..?  आशेवरती जगणे आता  जराही ना परवडे  म्हणे जगा आणि जगू द...

किरण चव्हाण वाढदिवस विशेष- यशवंत गुरव.

इमेज
  'वाढदिवस विशेष...किरण चव्हाण यांच्या लेखन कलेचा थोडक्यात घेतलेला एक आढावा...'                             "किरण सर आज तुमचा वाढदिवस... वाढदिवसाच्या लेखनातून शुभेच्छा... तुम जिओ हजारो साल...साल के दिन हो पच्चास हजार..."                                      गुरुवर्य आदरणीय इंद्रजीत देशमुख साहेब काकाजींच्या हस्ते आपल्या दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले.त्यानंतर 'नदीकाठचा संसार व लढा दोन कर्तृत्ववान मुलींचा या दोन पुस्तकांची महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समिती शासनमान्य यादीत समावेश झाला हे किती मोठे भाग्य आपले आणि आपल्या गावचे.  पुस्तक प्रकाशनाच्या वेळी आपल्या डोळ्यासमोर अडचणी उभ्या राहिल्या होत्या. हातात घेतलेला एवढा मोठा कार्यक्रम पार पडेल का..?आमच्या कार्यक्रमाला इंद्रजीत देशमुखसाहेब काकाजी  का.? येणाऱ्या पाहुण्यांची व्यवस्था होईल का..? जेवणाचा कार्यक्रम पार पडेल का.? स्टेज मिळेल का मंडप मिळेल का ? असे एक ना अ...

'मारुतीच्या संसाराला मिळालं पाठबळ.' - किरण चव्हाण.

इमेज
         'मारुतीच्या संसाराला मिळालं पाठबळ.'      "एक रिकामी ओंजळ कष्टाच्या फुलांनी भरली.     रित्या हातांची अखेर संकटे दूर सरली."                             आमच्या गावातील मारुती ज्ञानदेव वांजत्री एक भोळाभाबडं साधंसुधं व्यक्तिमत्त्व.परिस्थिती अगदीच गरिबीची तसाच गरीब स्वभावही. पंढरीचा माळकरी. पंढरीचा वारकरी, पांडुरंगाचा भक्त.अलीकडेचं आमच्या शिवम परिवारात ही माऊली सामील झाली आहे.लग्नसमारंभात उत्तम सनई वादक..भजनात उत्तम हार्मोनियम वादक..आणि कीर्तनात उत्तम पखवाज वादक असा एक हरहुन्नरी कलाकार.. व्यवसायाने वांजत्री असल्याने उपजतच अंगात असणारी संगीतकला..लग्नसराईत  वाजवण्याचा परंपरागत व्यवसाय..लग्नाच्या सिजनमध्ये आजूबाजूच्या परिसरातून..खेड्यापाड्यातून वाजवण्याचे विडे मिळायचे त्यातून उदरनिर्वाह चालायचा... पण सध्या ही कोरोनाची महाभयंकर परिस्थिती... लॉकडाऊन त्यामुळे लग्नसराई जवळजवळ बंदच यामुळे रोजगारचं खुंटला..                   ...

कविता तिन्हींसांजेच्या - तिन्हींसांजेचे सुख...किरण चव्हाण.

इमेज
                             'तिन्हींसांजेचे सुख...' लावलीस...देव्हाऱ्यात लामण दिव्याची सांजवात. आता बस बघू अशी माझ्या पुढ्यात.. काय निरखतेयस अशी एकसारखी. बघ तुझ्या डोळ्यांतही तिन्हींसांज दाटून आलीय. तिथेही एक लामनदिवा जळतोय सांजेचा. तेवतोय तळ पापणींच्या खाचेतल्या नितळ पाण्यावर. नको पापण्यांची उसंत काढून घेऊ. नको नको हलकीशीही पापणी ढळू देऊ नकोस. नाही तर मिटल्या पापण्यात दडेल ना तो...विझेलही... कसा तेवतोय बघ हळुवार  तुझ्या नितळ पवित्र ओल्या डोळ्यांत. कडकोपरा उजळवलाय काजळ काळ्या काठांवरही ओसडंलाय. ती वात तान्ह्या अंगाने  कशी शहारतेय बघ..सोसवेना का तिला सांजवाऱ्याचा झोत. कसे गं तुझे पुरातन राऊळासारखे हे निरामय नेत्ररूप. जुनेपुराणे देखणेपणाचे मनमोहक प्रसन्न पवित्र तीर्थस्थळच. दोन नयनपात्रांच्या काठांवर  विसावलेत अलगद समाधिस्त दोन पानमोती. त्या मोतीयांच्या नितळकाचेतून  सळसळणाऱ्या सोनसळी किरणांचे सोनेरी कवडसे.. हळुवार बिलगतायेत माझ्या नेत्रकटाक्षी. माजघरातील सांदकोपऱ्यात घुटमळणारी अवघी शांतता विसावल...

'स्वप्नंही मरतात...' - किरण चव्हाण.

इमेज
                          'स्वप्नंही मरतात...'                      माणसं मरतातच....                      पण माहिती आहे                       स्वप्नंही मरतात.                      ..नाही माहिती                      स्वतःचा गळा घोटून                       स्वप्नं आत्महत्याही करतात.                      हे तर खूपच मामुली..                     स्वप्नांच्यावर अन्याय, अत्याचार                           होतो.     ...

शाळेतील प्रसंगानुभव...चित्र पुसलं आणि-किरण चव्हाण.

इमेज
शाळेतील प्रसंगानुभव...                                   चित्र पुसलं आणि...                       चारची लहान सुट्टी संपली मुलं वर्गात येण्याची घंटा वाजली.मैदानावरची सैरावैरा पावलं वर्गाकडे वळाली.घामेजून गेलेली मुलं दम खात एकदाशी आपल्या जागेवर स्थिरावली.पाचवी वर्गावर माझा चित्रकलेचा तास.वर्गप्रवेश करताच हातवारे करून सगळ्या मुलांचा  एकच गिल्ला... "सर सर..आता चित्रकलेचा तास.." ही अशी मला आठवण करून देणं आणि दुसऱ्याचं क्षणी ..."चित्रं... चित्रं.... चित्रं." अशी एकच 'री' ओढली. "अरे हो हो...विचित्र मुलांनो तुम्हांला काही दमधीर आहे का नाही...अरे वर्गात तरी नीट येऊ द्याल काय लागलाय ओरडायला नुसतं चित्रं चित्रं..." असं बोलून त्यांच्या सुराला लगाम घालायचा प्रयत्न केला.  काय सांगायचं या मुलांना इतर विषयांच्या वेळी यांची दमछाक होते आणि या विषयाला मात्र  हे आमची दमछाक करतात..विचार केला कोणतं चित्रं काढावं बरं.?.आणि लक्षात आलं एक चित्रं पाहिलं होतं प...