पोस्ट्स

"पाठीमागच्या बेंचपासून पुढच्या बेंचपर्यंत: केंगार सरांचे मार्गदर्शन आणि शिक्षक होण्याची प्रेरणा"

इमेज
  पाठीमागचा बेंच, ती दुपार आणि  केंगार सरांचे ते बोल...                   २००६ साली दहावी उत्तीर्ण होऊन श्री.लक्ष्मी विद्यालय ज्युनिअर कॉलेज हसुर येथे मी ११ वी ला प्रवेश घेतला. कॉलेज जीवनाच्या वयात नुकतेच पदार्पण केलेले. पण माझा स्वभाव हा थोडा लाजरा बुजरा असल्याने सुरुवातीला मी शेवटच्या बेंचवर बसायला लागलो. अर्थातच शेवटचा बेंच म्हणजे मागे बसून दंगामस्ती करण्याऱ्या मुलांचा अड्डाचं. शेवटच्या बेंचवर  बसून मुलं हुल्लडबाजी गोंधळ करायची. मी ही त्या मुलांच्यात मिसळलो होतो पण माझा गोंधळ वगैरे करण्याचा कोणताच उद्देश नव्हता. आणि  मला असा गोंधळ वैगरे घालणं कधी जमलंही नसतं. आमच्या वर्गावर केंगार सर मराठी विषय शिकवायचे.एकदा  वर्गात सर शिकवताना मागे पोरांची चुळबुळ सुरू होती. सर अचानक आमच्या दिशेने आले. आणि सरळच मला म्हणाले ,  "किरण तू उद्या पासून पुढच्या बेंचवर बसायचं. तुला १२ वी ला ७५ % गुण मिळवायचे आहेत. आणि तुला डी.एड करून शिक्षक व्हायचंय एवढं लक्षात ठेव." या वाक्यानं मी चमकूनचं गेलो. माझ्या आतापर्यंत हे कधी डोक्यातच नव्हतं...

"माझा बाप आणि रुडीयार्ड किपलिंग: जीवनातील भावनिक प्रवास आणि अंतर्मनाचा अनुभव"

इमेज
  माझा बाप आणि रुडीयार्ड किपलिंग यांची कविता.                                   आजचा दिवस एक विलक्षण योगायोग घेऊन सुरू झाला. भल्या पहाटेच्या समयी मनपरिवर्तनाचा झालेला साक्षात्कार हा मला अचंबित करणारा होता. याला मानवी जीवनातील एक चमत्कृती म्हणूया की, एका दीर्घ चिंतनाचा जगण्याच्या अर्थाशी घातलेला मेळ म्हणूया. ते कसं ठरवावं.?  ही घटना सांगण्याच्या अगोदर अर्थातच माझ्या मानसिक आंदोलनाची थोडी पार्श्वभूमी लक्षात घ्यावीच लागेल.किंबहुना मला ती परखडपणे व्यक्त केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. जगणं म्हणजे समुद्राच्या लाटेसारखं चढउतार घेत किनाऱ्याला लागत असतं. तसंच जगण्याच्या चढउतारात मध्येचं घुटमळत असलेला मी. जीवनातील अशा काही घडामोडींनी सहनशक्तीच्या पलीकडे गेलेली दुभंगलेल्या मनाची नकारात्मक अवस्था. पालापाचोळ्यासारख्या विस्कटून सैरभैर झालेल्या भावना. काही केल्या ताबा मिळवता येणार नाही इतकं मोकाट सुटलेलं मन. अधीर झालेल्या मनाला संयमाच्या कोणत्या धाग्याने करकचून बांधावं अशी केविलवाणी झालेली अवस्था. स...

आर्दाळ शाळेतील शिक्षक-पालक मेळावा: सत्कार, प्रेरणा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीची गाणी"

इमेज
आर्दाळ शिक्षक-पालक मेळावा उत्साहात संपन्न.                        माध्यमिक विद्यालय आर्दाळ शाळेत शिक्षक-पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. सरस्वती प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.शाळेचे मुख्याध्यापक यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्राथमिक शिक्षक डॉ.मारुती डेळेकर यांचा कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.त्याचसोबत एन.एम.एम.एस व सारथी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक शरद पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले. शाळेचे माजी मुख्याध्यापक शंकर पावले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे डॉ.मारुती डेळेकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक व पालकांची भूमिका कशी असायला हवी याबद्दल आपले विचार व्यक्त केले. यानंतर शिक्षक व पालक यांच्यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती,अभ्यास, स्वयंअध्ययन याबाबत चर्चा झाली.  कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्...

वर्गातील गरमागरम भाकरीची गोष्ट – शालेय आठवणी

इमेज
  वर्गातील   गरमागरम भाकरीची गोष्ट....                        रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस परंतु  रविवारी आमच्या शाळेत ८ वी विद्यार्थ्यांचा सकाळी ८ ते १० या वेळेत NMMS चा तास ठेवला होता. माझ्या गावापासून शाळेचे अंतर १५-१६ कि.मी चे अंतर असल्याने सकाळी लवकरच घरातून बाहेर पडावे लागले. सकाळच्या प्रसन्न वातावरणात तासाला सुरुवात झाली. पुढ्यात एकूण सात विद्यार्थींनी होत्या. बुद्धिमत्ता हा विषय शिकवण्यास सुरू केला. एकेक संकल्पना सोडवत असताना वेळ कधी सरला कळला नाही. विद्यार्थ्यांनीही समरस होऊन बुद्धिमत्तेची उदाहरणे सोडवत होती. अशातच जवळपास साडे दहा वाजायला आले. मुलींना बाहेर सोडले. थोड्या वेळाने आत आल्या. तास संपण्याची वेळ संपून गेली होती. पण बुद्धीमतेची उदाहरणे सोडवण्याच्या उत्साहाने त्यांना कंटाळा आला नव्हता. आता घरी सोडायचं की पुढे तास घ्यायचा यावर आमची चर्चा सुरू झाली. त्यामध्येचं आमचा दत्तराज नावाचा सातवीचा विद्यार्थी तो आपला अभ्यास करण्यासाठी वर्गात येऊन बसला होता. तो आठवीच्या विद्यार्थीनींना चिडवण्याच्या हेतूने बोलल...

Book Introduction - Calvin Author - Ramakrishna Magdoom.

इमेज
  er 15, 2022 Book Introduction - Calvin Author - Ramakrishna Magdoom. A novel that explores the life of Sugaran Paksha and looks into the world of birds: Calvin                          A short novel 'Kalvin' written by Ramakrishna Magdoom based on bird life, which can be read while sitting, but the exact description of bird life is captivating.  Sometimes people who shoot birds with a gun, today their lives are written in novels.  This means that the novel testifies to how kind, sensitive and understanding human beings are to the world beyond their own existence.  The struggle in the world of Bayaji and Baya, the son-in-law and Sugarni couple and the parties living with them, is presented in a flowing style.  So far, novels related to human life have been read, but while reading this novel about bird life, there were many questions in the mind that how should the author have combined the nature o...

कलविण – पक्षी जीवनावर आधारित निसर्गकादंबरी | रामकृष्ण मगदूम

इमेज
सुगरण पक्षाच्या जीवनाचा वेध घेत पक्षी विश्वात डोकावणारी कादंबरी : कलविण                          पक्षी जीवनावर आधारित रामकृष्ण मगदूम लिखित 'कलविण' ही छोटेखानी कादंबरी बसल्या बैठकीत वाचून होणारी मात्र चक्क पक्षी जीवनाचा टिपलेला अचूक वेध मनाला  खिळवून ठेवतो. कधी काळी बंदुकीने पाखरं टिपणारे लोकं ते आज त्यांच्या जीवनावर कादंबरी टिपली जाते. याचा अर्थ मानव किती सहृदयी,संवेदनशील आणि स्वतःच्या जगण्यापलीकडचे विश्व समजून घेणारा आहे याची साक्ष ही कादंबरी देते. बयाजी आणि बया या सुगरण आणि सुगरणी जोडप्याचा आणि त्यांच्यासह राहणाऱ्या पक्षांच्या संसारातील संघर्ष ओघवत्या शैलीत मांडलेला आहे. आत्तापर्यंत मानवी जीवनाशी संबंधित कादंबऱ्या वाचनात आल्या परंतु पक्षी जीवनातील ही कादंबरी वाचताना मनात अनेक प्रश्न होते की, कादंबरीचे स्वरूप कल्पकता आणि वास्तवता याचा मेळ लेखकाने कसा घातला असावा ?. पण सुरुवातीला वाचताना आपण अलगद पणे मानवी विश्वातून निसर्गाच्या सानिध्यात पक्षी विश्वात कसे जातो हे कळतही नाही. म्हणजे मानवी मन हे एवढे विलक्षण आहे की...

महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर – जीवनचरित्र पुस्तक | सदानंद पुंडपाळ व पी ए पाटील

इमेज
महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर यांचे जीवनचरित्र उलघडणारे पुस्तक.                     रग तांबड्या मातीची..झुंज वाघाची हे महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित असलेले सदानंद पुंडपाळ व पी ए पाटील या लेखक द्वयीनी लिहिलेलं पुस्तक आहे.जोशीलकरांच्या जन्मापासून आतापर्यंतच्या विस्तारित व भरगच्च कारकीर्दीला अत्यंत सूक्ष्मपणे शब्दांतून उजाळा दिला आहे.चंदगड तालुक्यातल्या किणी सारख्या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबातला पै.विष्णू जोशीलकर यांचा जन्म. एकत्र कुटुंबात आठ भावंडांच्या सान्निध्यात गेलेलं बालपण. आईवडील ज्येष्ठ भावंडांकडून,नातेवाईकांकडून मिळालेलं प्रेम,संस्कार, शाळेतील शिक्षक  यांचे मिळणारे मार्गदर्शन.लहान वयापासून कुस्तीचे असणारे वेड त्यात दोन थोरले बंधू तालमीत सरावाला जात असत ते पाहून कुस्तीविषयी निर्माण होत गेलेले आकर्षण.अशाप्रकारे गावच्या तालमीच्या लाल मातीत उद्याचा एक महान कुस्तीगीर आकार घेतो. लहान वयातच या पठ्ठ्याच्या अंगातली रग दिसून येते ती म्हणजे दहावीला असताना मोकळी बैलगाडी चाके न फिरता चाके ...