आर्दाळ शिक्षक-पालक मेळावा उत्साहात संपन्न.
माध्यमिक विद्यालय आर्दाळ शाळेत शिक्षक-पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. सरस्वती प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.शाळेचे मुख्याध्यापक यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्राथमिक शिक्षक डॉ.मारुती डेळेकर यांचा कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.त्याचसोबत एन.एम.एम.एस व सारथी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक शरद पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले. शाळेचे माजी मुख्याध्यापक शंकर पावले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे डॉ.मारुती डेळेकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक व पालकांची भूमिका कशी असायला हवी याबद्दल आपले विचार व्यक्त केले. यानंतर शिक्षक व पालक यांच्यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती,अभ्यास, स्वयंअध्ययन याबाबत चर्चा झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक दशरथ अस्वले यांनी शिक्षक-पालक मेळाव्यास मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण लोहार यांनी केले तर सुहास कोंडुसकर यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा