पोस्ट्स

एक चित्तथरारक अनुभव."धाडसी तरुणाचा प्रयत्न: नेट हाऊस वाचवताना गाडी जळून गेली"

इमेज
  एक गाडी उभी करायचीय कारण...                ही गोष्ट आहे एका जिगरबाज तरुणाची आणि पेटलेल्या त्याच्या गाडीची. त्या दुपारच्या चित्तथरारक घटनेचा मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. आज आपण आजूबाजूला पाहतो डोंगराला आग लागण्याचे किंवा मुद्दामहून लावण्याचे प्रकार सर्वत्र दिसून येत आहेत.म्हणजे आग लावतो कोण आणि त्याच्या झळा सोसतो कोण अशी परिस्थिती..   असाच एक भर दुपारचा प्रसंग होता तो. उतुरकडून पिंपळगावच्या दिशेने येताना नवकृष्णा व्हॅली स्कुल जवळचा.कडकडीत उन्हात  खालून डोंगर पेटत येऊन नेट हाऊसच्या खालच्या बांधला असणाऱ्या गवताने पेट घेतला आणि क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. एक तर कडाक्याचे ऊन आणि वारा त्यामुळे आग जलद गतीने पसरत होती. गवत पेटून आगीचे लोळ उठत होते. आणि जवळजवळ ही आग आता त्या नेट हाऊसला लागणार अशीच सगळी परिस्थिती निर्माण झाली होती. पण हातात पाल्याचे डहाळे घेऊन मिळेल ते साधन घेऊन नवकृष्णा व्हॅली स्कुलचे प्राचार्य रामकृष्ण मगदूम आणि त्यांचे सहकारी शिक्षक,कर्मचारी तसेच  रस्त्याने येणारे जाणारे वाटसरू आपली गाडी थांबवून ती आग ...

"शाळेतील शेवटचा दिवस: मित्र, बेंच आणि आठवणींचा प्रवास" दहावी सदिच्छा समारंभ | आकाशी झेप घे रे पाखरा.

इमेज
  आकाशी झेप घे रे पाखरा.               अखेर तो दिवस आलाच. बाळांनो... घालमेल होत असेल ना जीवाची आतल्या आत. होणारच हो सहाजिकच आहे. आई बापाच्या घरात मायेने वाढलेली ,हसरी खेळकर, बागडणारी लेक जशी मोठी झाल्यावर सासरी जाताना, तिचा पाय घराबाहेर निघता निघत नाही. हळव्या क्षणांच्या गोड आठवणीं पायगुंता होऊन पुढे जाऊ देत नाहीत. अगदी तशी तुमच्या मनाची  आज अवस्था झाली आहे समजू शकतो बरं आम्हीं. ज्या उंबरठ्याच्या आत तुम्हीं ज्ञान घेण्यासाठी यायचात. तो उंबरठा ओलांडून ते ज्ञान घेऊन बाहेरच्या जगात तुम्हीं चाललात. आज तुम्हीं देहान इथून बाहेर जाल पण मनानं या वर्गातच रेंगाळणार आहात काही दिवस तरी. ज्या बेंचवर बसायचात, प्रत्येकाचा आपापला बेंच आणि सोबती ठरलेला असायचा. कधी कधी माझा बेंच म्हणून हुज्जत घालायचात एकमेकांच्यासोबत. तो बेंच आज तुम्हांला सोडून जावा लागणार. ज्या बेंचवर एकत्र बसायचात ते मित्र उद्या कुठल्या कुठे असतील, उद्या त्यांच्या बसायच्या जागा वेगवेगळ्या असतील..                       सकाळची नेहमी प्रार्थ...

'जाता पंढरीशी...' इंद्रजीत देशमुख काकाजी पंढरीच्या वारी सोहळ्याचा अनुपम्य समृद्ध ठेवा.

इमेज
'जाता पंढरीशी...' पंढरीच्या वारी सोहळ्याचा अनुपम्य समृद्ध ठेवा.                   परमपूज्य गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजींच्या लेखणीतून साकार झालेले 'जाता पंढरीशी' हे पुस्तक आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने वाचले.परमपूज्य गुरुवर्य डॉ.श्रीकृष्ण देशमुख काकाजींचे प्रासादिक आशीर्वचन, ह.भ.प बाळकृष्ण चौगले महाराज यांची समृद्ध प्रस्तावना आणि मग गुरुवर्य काकाजींच्या सिध्दहस्तलेखणीतून प्रसवलेली शब्दवारी सुरू होते. अखंड आठरा-एकोणीस दिवसांच्या पंढरीच्या वारीचा सुखसोहळा अनुभवण्याचे भाग्य वाचावयास मिळते. एखाद्या गावी जाताना जसे आपण नटून थटून जातो तसे 'जाता पंढरीशी' या ग्रंथातील संत वचनाचे दाखले देत पुढे पुढे सरकणारी अर्थपूर्ण शब्दवारी,देखणी छायाचित्रं,माझ्या वारकऱ्यांच्या प्रसन्न भावमुद्रा,अर्थसुलभ ओघवती भाषा,भावनेने रसरसलेली-ओथंबलेली शब्दरचना असा एकंदरीत जाता पंढरीशी हा ग्रंथ नटून थटून जणू विठ्ठलाच्या भेटीला आपल्यासवे वाचकाला घेऊन जातो आहे असे वाटते. पंढरीची वाट मनाचा ठाव घेते.शब्दांच्या वारीत सकळ वैष्णवजन ,लहानथोर,विठ्ठलनामाचा गजर करत अंगावर पावसाच्या सर...

"मुख्याध्यापक श्री. शरद पाटील सर यांचा जन्मदिन – शाळेच्या बाप हृदयाचा साजरा"

इमेज
 आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री.शरद पाटील सर यांचा आज जन्मदिन त्यानिमित्त... माझिया जातीचे मज भेटो कोणी...                            शाळा म्हणजे दुसरं कुटुंब असतं आणि या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख असतात ते म्हणजे मुख्याध्यापक. खरं तर मुख्याध्यापक हे वडीलकीची भूमिका निभावत असतो. त्यांच्यावर शाळा-विद्यार्थी, शिक्षक-कर्मचारी यांची जबाबदारी असते. अर्थात या सर्वांच्या बाप हृदयाची जागा त्याला घ्यावी लागते. त्यांची काळजी वहावी लागते. खरं तर अशा सर्वांच्या बापपणाचं दुसऱ्यांदा भाग्य मिळणारा मुख्याध्यापक हा जसा भाग्यवान माणूस असतो.तसा बाप मायेच्या हृदयाचा मुख्याध्यापक लाभणंहे त्या शाळेचं भाग्य असतं. आणि असाच आमच्या शाळेचे बाप हृदयाचे कुटुंबप्रमुख मुख्याध्यापक म्हणजे आमचे श्री. शरद पाटील सर.                 अगदी जून महिन्यात मी बदली होऊन या शाळेत दाखल झालो. तसा सुरुवातीपासूनचं सरांचा आणि माझा परिचय होता अनेकदा संवाद व्हायचा. पण प्रत्यक्षात ज्यावेळी सर मुख्याध्यापक म्हणून लाभले त्यावेळी...

"आजऱ्यातील रामतीर्थ: आत्मिक शांती आणि सुख-साधनाचा अनुभव"

इमेज
  आजऱ्यातील रामतीर्थ म्हणजे आत्मिक शांती,सुखा समाधानाचे तीर्थ.                                 आजरा तहसिल कार्यालयाच्या सभागृहातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रशिक्षण संपवून मी आणि आमचे लोहार सर सहजच एका कँटीनमध्ये शिरलो. खुर्चीवर बसताना भिंतीवरच्या एका भल्या मोठ्या डिजिटल फोटोने मन वेधून घेतले.  तो फोटो होता रामतीर्थ धबधब्याचा. त्या सुंदर धबधब्याचा फोटो न्याहाळत मी लोहार सरांना सहजच म्हणालो. "किती सुंदर वाटतो हो धबधबा आणि हे ठिकाण..मी आजवर कधीच गेलो नाही इथे..." तसे लागलीच सर किंचितसे आश्चर्याने म्हणाले, "गेलात नाही अजून...? इथून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे.जाता जाता जाऊ आपण."  आम्ही कॅन्टीनमधून बाहेर पडलो. मुख्य रस्त्याला लागल्यानंतर अगदी थोड्याच अंतरावर लागलीच डाव्या बाजूला रामतीर्थाकडे जाणारा अरुंद पण दोन्हीं बाजुंनी झाडांनी वेढलेला रस्ता लागला. रस्त्याच्या दोन्हीं काठानी विस्तारलेली वडाची झाडे. जटाधारी ऋषिमुनी आपल्या जटा मोकळ्या सोडून ध्यानस्थ बसावेत तसे जागोजागी शांत उभी असलेली व...

"पाठीमागच्या बेंचपासून पुढच्या बेंचपर्यंत: केंगार सरांचे मार्गदर्शन आणि शिक्षक होण्याची प्रेरणा"

इमेज
  पाठीमागचा बेंच, ती दुपार आणि  केंगार सरांचे ते बोल...                   २००६ साली दहावी उत्तीर्ण होऊन श्री.लक्ष्मी विद्यालय ज्युनिअर कॉलेज हसुर येथे मी ११ वी ला प्रवेश घेतला. कॉलेज जीवनाच्या वयात नुकतेच पदार्पण केलेले. पण माझा स्वभाव हा थोडा लाजरा बुजरा असल्याने सुरुवातीला मी शेवटच्या बेंचवर बसायला लागलो. अर्थातच शेवटचा बेंच म्हणजे मागे बसून दंगामस्ती करण्याऱ्या मुलांचा अड्डाचं. शेवटच्या बेंचवर  बसून मुलं हुल्लडबाजी गोंधळ करायची. मी ही त्या मुलांच्यात मिसळलो होतो पण माझा गोंधळ वगैरे करण्याचा कोणताच उद्देश नव्हता. आणि  मला असा गोंधळ वैगरे घालणं कधी जमलंही नसतं. आमच्या वर्गावर केंगार सर मराठी विषय शिकवायचे.एकदा  वर्गात सर शिकवताना मागे पोरांची चुळबुळ सुरू होती. सर अचानक आमच्या दिशेने आले. आणि सरळच मला म्हणाले ,  "किरण तू उद्या पासून पुढच्या बेंचवर बसायचं. तुला १२ वी ला ७५ % गुण मिळवायचे आहेत. आणि तुला डी.एड करून शिक्षक व्हायचंय एवढं लक्षात ठेव." या वाक्यानं मी चमकूनचं गेलो. माझ्या आतापर्यंत हे कधी डोक्यातच नव्हतं...

"माझा बाप आणि रुडीयार्ड किपलिंग: जीवनातील भावनिक प्रवास आणि अंतर्मनाचा अनुभव"

इमेज
  माझा बाप आणि रुडीयार्ड किपलिंग यांची कविता.                                   आजचा दिवस एक विलक्षण योगायोग घेऊन सुरू झाला. भल्या पहाटेच्या समयी मनपरिवर्तनाचा झालेला साक्षात्कार हा मला अचंबित करणारा होता. याला मानवी जीवनातील एक चमत्कृती म्हणूया की, एका दीर्घ चिंतनाचा जगण्याच्या अर्थाशी घातलेला मेळ म्हणूया. ते कसं ठरवावं.?  ही घटना सांगण्याच्या अगोदर अर्थातच माझ्या मानसिक आंदोलनाची थोडी पार्श्वभूमी लक्षात घ्यावीच लागेल.किंबहुना मला ती परखडपणे व्यक्त केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. जगणं म्हणजे समुद्राच्या लाटेसारखं चढउतार घेत किनाऱ्याला लागत असतं. तसंच जगण्याच्या चढउतारात मध्येचं घुटमळत असलेला मी. जीवनातील अशा काही घडामोडींनी सहनशक्तीच्या पलीकडे गेलेली दुभंगलेल्या मनाची नकारात्मक अवस्था. पालापाचोळ्यासारख्या विस्कटून सैरभैर झालेल्या भावना. काही केल्या ताबा मिळवता येणार नाही इतकं मोकाट सुटलेलं मन. अधीर झालेल्या मनाला संयमाच्या कोणत्या धाग्याने करकचून बांधावं अशी केविलवाणी झालेली अवस्था. स...