पोस्ट्स

'मृत्युंजया..कोमल गोडसे पवार.'

इमेज
'मृत्यूशी कडवी झुंज दे ऊन मृत्यूवर मात करणारी मृत्युंजया..कोमल गोडसे पवार.'                                 एक प्राणज्योत...तेवतेय आपल्या नादात.स्वयंस्फूर्तीने उजळवतेय आपला भोवताल.पण अचानक तिच्या अवतीभोवती घोंगावू लागतं ते काळवाऱ्याचं वादळ...ती थरारते.. बिथरते...तिचा अस्तित्वासाठी संघर्ष सुरू होतो त्या वादळाशी...ते वादळ तिला मालवू पहात होतं... पण ती मात्र विझायला तयार नव्हती...पण भयाण काळवाऱ्याच्या वादळात अडकलेली ती ज्योत...हळूहळू क्षीण होत होती.तिच्याभोवतीचा काळोख अधिकच दाट होत होता.पुढचं अंधकार भविष्य कसं लख्ख दिसू लागलं होतं..तो निष्ठुर काळ तिला झुंजवत..छळत होता तिच्या प्राणांसाठी आतुरला होता..प्राण तिच्या कंठाशी आले होते.त्याने पुरता कब्जा केलाच होता. पण आता तिचाही संयम ढळत होता...तिला ही आता स्वतःहून विझू वाटत होतं...पण मुळात ती एकटी नव्हती जीवलगांचे अनेक हात  तिला विझण्यापासून वाचवत होते.त्यांच्यामुळेच तर  विझता विझता सावरून ती पुन्हा उभी ठाकत होती..प्रत्येक श्वासागणिक तिचा संघर्ष ठरले...

कोरोनातल्या कविता-'गड्यानों आपला गाव वाचवूया'. -किरण चव्हाण.(पांगिरे)

इमेज
           'गड्यानों आपला गाव वाचवूया'. बघताईसा नवं जगामधी काय चाललंया. आपल्या देशातबी कोरुनानं थैमान घातलया. परमुलखातनं आता ह्यो आपल्याकडं येतूया. ...तवा गड्यानों आपणच आपला गाव वाचवूया. दिवसाला हजारानं लाखामधी माणसं मरत्याती. मोठ्या देशांनीबी या रोगापुढं हात टेकल्याती. इचार करुन प्रत्येकानं काळजी घेऊया. ...तवा गड्यानों आपणच आपला गाव वाचवूया. तोंडाला मुसकं घालावंच लागल. चारचौघात अंतर ठेवावच लागल. इनाकारण कुठबी फिरायला नगं. कुठल्याबी गावाला जायला नगं. जवळच्या पाहुण्यालाबी लांबनच रामराम करूया. ...तवा गड्यानों आपणच आपला गाव वाचवूया. पोलीसपाटील, सरपंच, कोरोनासमिती. गावची बघा किती काळजी घेती. गावच्या येशी साऱ्या बंद केल्याती. कोण येतंय जातंय त्यांवर पाळत ठेवत्याती. आपणबी त्यास्नी पुरेपूर सहकार्य करूया. ...तवा गड्यानों आपण आपला गाव वाचवूया. आता गावाकडं येतील मुबंईपुण्याची लेकरं-बाळं. तवा त्यास्नी लांबच ठेवावं लागल कोरोनाच्या धोक्यामुळं. खाण्यापिण्याची,ऱ्हाण्याची येवस्था बाहीरच करावी लागल. जीवाच्या काळजीसाठी थोडं कठोर व्हावं ला...

कोरोनाच्या संकटकाळीन परिस्थितीत गरजूंना मदतीचा हात.

इमेज
'कोरोनाच्या संकटकाळात गरजवंतांना नाम फाउंडेशन,मुरगुड,पांगिरे शिवम परिवाराचा मदतीचा हात.'                                       आमच्या गावापासून दोन किलोमीटर अंतरावर लमाण लोकांची पालं उतरली आहेत..एकूण पाच पालांमध्ये सात कुटुंब आहेत. आम्हांला माहिती समजली की,त्यांच्याकडील शिधा संपत आलेला आहे..त्यांना मदतीची गरज आहे. लागलीच आम्हीं त्या पालावर जाऊन त्या लोकांची भेट घेतली.. महिला आपल्या पालासमोर हताश होऊन बसलेल्या होत्या.पुरुष मंडळी खालच्या शिवारात एकेठिकाणी हातावर हात बांधून बसलेली.त्या महिलांचे चिंताक्रांत आणि त्यांच्या पुढ्यातील मुलांच्या केविलवाण्या चेहऱ्यावरून सगळी परिस्थितीत लक्षात येत होती..तरीही आम्हीं त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली... साधारण महिनाभरापूर्वी हसूर येथून धान्य व किराणा स्वरूपात मदत झाली होती तसेच पांगिरे स्वस्त धान्य दुकानातून तांदूळ देण्यात आले होते..भुदरगड प्रतिष्ठानतर्फेही जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले होते. पण तो शिधा संपत आला होता..आणि आता कसेतरी दोन दिवस पु...

कविता- 'सलाम तुमच्या कार्याला'.कोरोना लढाईतील योध्याप्रति. -किरण चव्हाण.(पांगिरे)

इमेज
'सलाम तुमच्या कार्याला' तुमच्या कार्याचा आम्हांला आहे खूप खूप अभिमान. तन-मन अर्पण करून तुम्हीं जपता आहात समाजभान कर्तव्याला बांधील राहून तुम्हीं वाहून घेतले सेवेसाठी. कर्तव्याचा प्रत्येक क्षण तुमचा जनतेच्या कल्याणासाठी. डॉक्टर,परिचारिका रात्रंदिवस जपताहेत जीवांची सुरक्षितता. उपचार,काळजी,सेवा करणारे तुम्हीचं आमचे रक्षणकर्ता. नियमांचे कठोर पालन करण्या नेहमी पोलिसांची खबरदारी. नियम जो पाळणार नाही त्याची मोडून काढतात दादागिरी. कायदा-सुव्यवस्था बळकट करण्या तुम्हीं कार्यतत्पर असता. उल्लंघन करील जो कोणी त्यास खाकीचा धाक दाखवता.. सफाई कामगार,अधिकारी,कर्मचारी कोरोनाची ही लढाई प्राणपणाने लढता आहात. रणांगणावरचे आमचे शूर योद्धे तुम्हीं शोभता आहात. देवळात देव नाही आमचा तो तर आहे तुमच्या सर्वांच्या रुपात. अखंड काळजी वाहता आहात कारण आम्ही रहावं सुखात. स्वतःच्या जीवलगांना दूर लोटून तुम्हीं आमचा जीव वाचवता आहात. आम्हीं घरी सुरक्षित रहावं  म्हणून जिवावरची जोखीम पत्करता आहात. आले जसे हे संकट तसे निघूनही जाईल हे पण दिवस जातील. पण खरंच तुमच्यासारखे लढवये आमच्या सद...

कविता- 'आमच्या गावाला जाऊ द्या.'...किरण चव्हाण.(पांगिरे)

इमेज
        'आमच्या गावाला जाऊ द्या.' आसला कसला त्यो कुठंन कुरुना आला. जिंदगीचा साऱ्या खेळ खडूंबा झाला. पोटासाठी आम्हीं माणसं परमुलखातून आलो. पॉट तर उपाशीच वर भिकारी झालो. दिनरात दगडा मातीसंग झट्ट दियाचं. तवा कुठं पोटाला पोटभर खायाचं. आता सगळंच बंद झालया हाताला मिळना काम. काम न्हाई तर आम्हांला कोण बरं दिल दाम.. रेड्यासारखं गडी आमचं,हातावर हात बांधून बसलं. बायांनी शिजवायचं काय आणायचं तरी कुठलं.? पोटाची भूक ती आम्हीं कशी तरी आवरू. पर कसं ऱ्हाईल वं उपाशी आमचं   नकाडं लेकरू. रक्ताच्या नात्यातली घरची दोन माणसं मेली. नाही जाता आलं गावाला गोतावळ्या माघारीच नेली. कायली व्हती नुसती जीवाची कायबी कळना. डोळ्याची धार आता तुटता तुटना. आणि काय वाट्याला यायचं हुतं लई भोग भोगलं. असं जिण्यापरीस वाटतं मराण लई चांगलं. गावाकडं जायाचं कसं वाट गवसना. आणि किती दिस सोसायचं आता राहवना. कुरुनामुळ आलं एकदासं मराण तरी येऊ द्या. पर पयल आम्हांस्नी आमच्या गावाला जाऊ द्या.. ----------------------------------------------         ...

कोरोना गीत- कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं...किरण चव्हाण.(पांगिरे)

इमेज
(आरं आरं माणसा तू येडा का खुळा रं...या चालीवर) ----------------------------------------------                 कोरोना गीत... कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं... आरं आरं माणसा तू येडा का खुळा रं कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं... कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं...(कोरस)...!!धृ!! समजून घे तू या कोरोनाचा धोका कुठं कसा पसरलं नाही तो भरोसा गाफील तुम्हीं राहू नका,सावध असा रं कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं...!!१!! साऱ्या जगामधी त्यानं थैमान घातलया, माणसाच्या जीवासंग खेळ खेळतुया मरण झालंय स्वस्त इथं भान असू द्या रं कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं..!!२!! तरी तुला कसं....कळना माणसा..? फिरतोस जिथं तिथं वाचशील कसा..? नको येड्या फिरू कुठं घरी थांबूया रं.. कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं..!!३!! देव आपुला रं आता देवळात नाही डॉक्टर,नर्स,पोलिस तोच, काळजी आमुची वाही नको होऊ कृतघ्न तू त्यांचे जाण उपकार कोरोनाचं संकट आलं सांभाळून ऱ्हा रं..!!४!! नको घाबरू तू नको सोडू आशा दूर होईल संकट मिळल जीवाला दिलासा.. कोरोनावर मा...

'गावकुसातील कथा' -'इस्वासघात' - किरण चव्हाण. (पांगिरे)

इमेज
            'इस्वासघात'                                 सात वरसाची आसल तवा गळ्यात माळ पडली.एक सवतर भण आदीच या घरात दिली व्हती.आणि आता दोघी सख्खा भणी सख्या जावा म्हणून अशा मिळून तिघी भणी एकाच घरात नांदणार व्हत्या.आडमुठ्या तिघी एकाच घरात कशा द्यायच्या...? पानोठ्यावरनं तिघीनी पाणी कसं आणायचं..? म्हणून.. दोघा पाहुण्यांस्नी कोडं पडलं.मग काय नवरीच्या बापानं मंडपात गायच आणली आणि एक आगुदरच दिल्याली लेक, आता दोघी सख्या भणी आणि चवथी गाय अशी तडजोड करून घर भरणी करून दिली. सखू आणि शारु सख्या भणी आणि मालू सवतर भण सख्या जावा म्हणून नांदायला लागल्या...सखु रंगानं काळी आणि शारु तिच्यापरास उजवी व्हती,रंगानं पण गोरी.साताप्पा मुंबईत कामाला.. त्यामुळं राहणीमान जरा शहरी..थोरला भाऊ गावाकडं शेतीभाती बघायचा. धाकटा साताप्पा नवरा म्हणून एकटाच नवऱ्या बघायला आला..थोरला आलाच नाही त्यानं सांगूनच टाकल्यालं "आप्पा तू एकटाच जा पोरगी बघायला..मी आदीच एकदा बघितल्यात ती काळी हाय ती थोरली मी करून घेतो..नी धाक...