पोस्ट्स

विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तकाच्या अनुषंगाने.

इमेज
  'विनाअनुदानितची संघर्षगाथा पुस्तकाच्या अनुषंगाने...'                          गुरुवर्य इंद्रजीत देशमुख काकाजी आणि आपापल्या क्षेत्रात उत्तुंग उंची गाठलेली कर्तृत्ववान मंडळी या ग्रुपमध्ये सहभागी आहेत.त्या सर्वांना माझा प्रथमतः नमस्कार. मी आपणा सर्वांचे आभार मानतो की,आपण सर्वजण शिक्षणक्षेत्रातील 'विनाअनुदानित' या  विषयावर नजीकच्या काळात येणाऱ्या 'विनाअनुदानितची संघर्षगाथा' पुस्तकासाठी सहभागी झाला आहात.या अनुषंगाने हा ग्रुप स्थापित करताना आतापर्यंत ग्रुपवर पुस्तकाची नोंदणी,माहिती व चर्चा होत राहिली..अशा उद्देशासह हा ग्रुप स्थापण्यामागचा मूळ उद्देश प्रामुख्याने आणखीन स्पष्टपणे उघड झाला पाहिजे असं मला वाटतं. गेली दोन महिन्यापासून माझे जिवलग सहकारी बंधू मनापासून पुस्तकाचा उद्देश ,हेतू सर्वांपर्यंत पोहोचावा याकरिता धडपडत आहेत.दरम्यान ही वाटचाल करताना सध्याच्या कोरोना महामारीचेही गडद सावट आहेचं.याची आम्हांला पूर्णपणे जाणीव आहे.ग्रुपचा प्रतिसाद लक्षात घेऊन शिक्षण, साहित्य, कला,सांस्कृतिक, सामाजिक ,प्रशासकीय अशा विविध क्ष...

कविता - भूक. -किरण चव्हाण.

इमेज
                                    भूक. तिच्या दोनचार पैशांच्या वाटीचा तो खडखडाट प्रत्येकजण ऐकत होता. पण तिला ना कुणाला त्याच काहीही वाटत नव्हतं. कोवळ्या हातातील तो भला कितीदा ती न्याहाळायची. आणि तसाच एकेक रुपया ती झोळीमध्ये टाकून द्यायची. मुठीमधल्या त्या पैशांची गणितं तिला अजिबात मांडता येत नव्हती. गोल बंद्या रुपयाशी ती फक्त खेळत असायची. कोवळे गोबरे गाल,मऊशार ओठ किती सुदंर दिसत होती. चमकणाऱ्या सोनेरी केसांची वेणी पण पार विस्कटून गेली होती. सजली धजली असती तर गोडशी परीच शोभली असती पण कुणाचं ठाऊक ती अशी असूनही ती तशी का दिसत नव्हती. खेळण्या बागडण्याचं वय पण खांद्याला झोळी अडकलेली पाणीदार डोळ्यातील तिची नजर सतत कुणाला तरी न्याहाळणारी. माणसांच्या मागे धावून ती अनेकदा थकून जायची. पण येणाजाणाऱ्यांच्या पुढे ती पुन्हां पुन्हां हात पसरायची. वाटीत पडणारा एकेक पैसा पाहून ती खूप आनंदीत व्हायची आणि आनंदाच्या भरात वाटीमधला पैसा ती हवेत उडवायची. लोकांनी तिच्या वाटीत टाकलेला एकेक पैसा म्हणजे तिला घातलेली भीक होती...

सजा-ए मौत -किरण चव्हाण.

इमेज
  'पुलवामा में हमारे वीर जवानों पर उन गद्दारों ने पीठ पीछे हमला किया और बड़ी संख्या में हमारे वीर जवान शहीद हो गए उन शहीद जवानों के भावपूर्ण आदरांजली और उनके प्रति ये रचना समर्पित..'  ' सजा-ए -मौत' ए दहशतवादी गद्दार साले पीठ पीछे  वार करते है | अरे हमारे मुल्क में मच्छर भी सामने से काटते है |  कैसे कहूँ दुर्भाग्य है उस धरती का जिसमे पैदा हुई ऐसी जिंदा लाशें | हमारे गटर में पैदा हुए किडे-मकोडे भी है तुमसे बेहतर | तुम जिंदा मुर्दों की बात क्या करें,  तुम तो मानव जाती पर कलंक हो | क्या औकात हैं तुम्हारी ? कभी पूछो अपने जन्म देने वाली माँ को,  शरम आती होगी, पछताई होगी अपने आप पर  जो पैदा हुआ ऐसा पाप अपनी कोकसें | किसी कोने में छीपकर हमें धमकाने वाले..नहीं हम कुछ नहीं कहेंगे | क्योंकी तुम्हे मालूम है,खुद अपने आपको तुम हो डरपोक  अपनी दुम टांगो में लेकर किसी आडसे भौंकनेवाले... अरे हमारे घर के पालतू कुत्तेभी ईमानदारीसे जीते हैं और सामनेसे भौंकते हैं | सामने आने की हिम्मत नही होती इसलिए पीछे से आते हो बार बार,  पीठ पर वार करने की आदतें हैं तुम्हारी नाम...

ग्रेट भेट-उर्जानिर्मिती क्षेत्रातील पल्लवी यादव यांच्याशी संवाद..- किरण चव्हाण.

इमेज
ऊर्जानिर्मिती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदरणीय पल्लवी यादव यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.             ऊर्जानिर्मिती क्षेत्रात सध्या पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या समुद्रातील खनिज तेल,नैसर्गिक वायू अशा ऊर्जानिर्मिती क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने एक महिला म्हणून यशस्वी कार्य केले. १२० वर्ष जुन्या असलेल्या व ऑइल क्षेत्रात मोठं नाव असलेल्या जागतिक नामांकन 'बेकर ह्युजेस' या कंपनीत २००६ पासून त्यांनी नोकरीला सुरुवात केली.समुद्रात राहून समुद्रतळाच्या खाली तीन ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत ड्रीलिंग करून समुद्राच्या पोटातील कच्चे तेल उपसले जाते अशा ठिकाणी खनिज तेलाचे व नैसर्गिक वायूचे साठे अचुकरित्या शोधणे हे अशा महत्वाच्या कामाची जबाबदारी पल्लवी यांच्याकडे होती.हे काम सलग करावे लागते अशावेळी अनेक अडचणी व आव्हानांचा सामना त्या ठिकाणी करावा लागतो. आजपर्यंत त्यांनी इराक,कतार, युनायटेड अरब अमराती अशा आखाती देशामध्ये काम केले आहे.इराकमध्ये असताना ऑइल रिगवर एकटीच महिला इंजिनिअर म्हणून त्या काम करीत होत्या त्यावेळी पुरुषांच्या बरोबरीने एक महिला उ...

गांव विकताना पाहिला - किरण चव्हाण.

इमेज
                          गांव विकताना पाहिला दिवसाढवळ्या  लोकशाहीचा उदो उदो पाहिला. आणि रात्रीचं माझा गांव मी विकताना पाहिला. बोल किती द्यायचं पाचशे हजार..दोन हजार मताला.? अहो तुम्ही द्याल तेवढं मी हायचं की तयार घ्यायला. तो बघा आताच हजार देऊन गेला तुम्ही किती देताय.? हे घे दोन हजार त्याच्यापेक्षा डब्बल. मी काय कमी वाटलो का काय..? मग उचल भंडारा,घे शपथ,म्हण माझं मत नाही बदलत. हा बघ उचलला,घेतली शपथ तुझ्या आईच्यान नाही बदलत.. दारू आमची मजा तुमची जाऊ दे गाडी सरळ धाब्यावरती. खा-प्या भरा पोटं आडवं- तिडवं पण बोट बरोबर बटणावरती. दारू मटण पैशावरती गांव ताव मारताना पाहिला. आणि रात्रीचं माझा गांव मी विकताना पाहिला. काय होता इतिहास इथे मातीचा... मातीसाठी माणसांचा. सारं काही विसरला माणूस क्षणात पैशासाठी बदलला. आणि रात्रीचं माझा गांव मी विकताना पाहिला. स्वराज्यासाठी,मातीसाठी,राजाच्या एका शब्दासाठी जान कुर्बान करायचीत इथं माणसं. आणि आता कोण कुठला ,कुणाच्या स्वार्थासाठी आज स्वतःलाच विकायला  तयार झालीत माणसं. भंडारा उचलायचे इथे ए...

'असावे सुंदर असे माझे गांव.'-किरण चव्हाण.

इमेज
  (देवा तुझे किती सुंदर आकाश या गीताच्या चालीवर) 'असावे सुंदर असे माझे गांव.' असावे सुंदर असे माझे गाव गुण्यागोविंदाने सर्वांनी रहावं नको कुणी दुःखी असो सर्व सुखी  गोड वाचा असो सर्वांमुखी गरीब श्रीमंत नको भेदभाव सर्वांभूती असो समभाव आपणची ठेऊ गावची स्वच्छता  दिसावी सर्वांना सुंदरता गावाचा विकास मिळुनी करूया  आम्हीं प्रगतीची कास धरूया लहानांची कदर मोठ्यांचा आदर एकत्र कुटूंब तेचि सुखी घर गुणी सज्जनांचा असो अधिवास करावा उपदेश सकळ जनास अवघाची गांव एकीने नांदावं समृध्द संपन्न गांव माझे व्हावं.

भारताची जलतरणपटू कांचनमाला पांडे-देशमुख- किरण चव्हाण.

इमेज
'जलतरणामध्ये सुवर्णमयी इतिहास रचणारी भारताची जलतरणपटू जलकन्या कांचनमाला पांडे- देशमुख.'                                         ती एक लाट बेधुंदपणे पाण्यावर स्वार होऊन यशाचा किनारा गाठणारी. तिचं नी पाण्याचं जिव्हाळ्याचं अतूट घट्ट नातं.तिनं आत्मविश्वासाने  झेपावं आणि कवेत घ्यावं पाण्याने तिलाही.पाण्याच्या पाठकुळीवर स्वार होऊन पादाक्रांत केलीत तिने यशाची अनेक शिखरे... रचलाय एक नवा इतिहास.साकारलाय अद्वितीय विजय.स्वतःच्या दृष्टीहीनतेवर मात करत देशाच्या जलतरणाला जागतिक स्तरावर जिने एक नवी दृष्टी दिलीय.मनातल्या स्वप्नांना सत्यात उतरवताना त्या प्रत्येक स्वप्नांना लाभलाय प्रत्येक वेळी यशाचा किनारा...प्रखर जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर तिने पार केलाय भवसिंधु...स्वप्नांच्या मागे पोहताना ती आता पोहोचलीय सातासमुद्रापार. तिला माहितीचं नाहीं कधी थांबणं. आणि तिला कोणी थांबवूही शकत नाही..तिनं गाठलाय आता आयुष्यातला सुवर्णमयीक्षण.येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना झुगारून देत तिने अखेर सिद्ध केलंय...