"बा मेघराजा...मी एक पूरग्रस्त बोलतोय."

"बा मेघराजा...मी एक पूरग्रस्त बोलतोय." आसमानी सरी बरसतात काळ बनून आणि अंदाधुंद तांडव करून जातोस मेघराजा.तुझ्या जीवावर प्रजा सुखात आनंदात नांदते...त्या प्रजेचं अतोनात हाल करून छळून..लुटून जातोस बिचाऱ्या.बा मेघराजा एवढा कसा काय रे निष्ठुर होतोस..? जो प्रेमानं धरणीमायेवर बरसावा तो असा कोपिष्ट होऊन का खवळवतो.बरसायला लागलास की बरसत राहतोस नुसता वेड्यासारखा.. तुझं तुलाही नाही भान रहात.व्यापून टाकतोस धरणीमायेच्या सर्वांगाला.तिच्या लेकरांनी तिच्या कुठल्या कुशीत लपून बसावं रे? जराही ठाव नाहीस देत. काय बोलावं आणि कुणापाशी बोलावं..? तुला वाईट तरी कसं म्हणावं..? तारणारा तूच आणि मारणाराही तूच.एका हातानं देणारा तूच अन दुसऱ्या हातानं असं काढून घेणाराही तूच. तूच आहेस डोळ्यात प्राण आणून ज्याची आंम्ही वाट पाहतो...तू बरसायला लागलास की,आमच्या आनंदाला उधाण येतं.सुखस्वप्नं पहावी ती त...