महाराष्ट्रातले आमदार बेघर झाले आहेत का..? - किरण चव्हाण.

महाराष्ट्रातले आमदार बेघर झाले आहेत का..? कुणी घर देता का रे घर ? भिंती वाचून, छपरा वाचून माणसांच्या मायेपासून ,देवाच्या दयेपासून वंचित आहे.कुणी घर देता का रे घर..? महाराष्ट्रातल्या आमदारांची आज अशी अवस्था झाली आहे का..? आमदार इतके बेघर झालेत का.? म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वपक्षीय आमदारांसाठी मुंबईत मोफत घरं बांधून देण्याची घोषणा करावी लागते. आता आमदार सुद्धा बेघरांच्या यादीत आले म्हणायचे ? मग दारिद्र्यरेषेखालील गरीब कुटुंबाना व बेघरांना मोफत घर हवे असेल तर त्यात आणखीन एक अट घालावी लागेल की आपण आमदार असायला हवे. म्हणजे हा विरोधाभासचं काही कळत नाही की आपला महाराष्ट्र इतका दयनीय झाला आहे की इतका समृद्ध,संपन्नशाली झाला आहे.की जो लोकप्रतिनिधीनाचं आता मोफत घरे बांधून देऊ शकतो. किती संतापजनक आणि निषेधार्ह गोष्ट आहे. ज्या लोकांना आपण विकासाच्...