पोस्ट्स

कविता संग्रह

 अनुक्रमणिका १. मायबापा २.गुरू ३. माझा गुरू ४. संस्कारांचा परिसरस्पर्श ५. ओव्या ६. पांडुरंग ७. भार ८. हरी मुखे म्हणा ९. ऋण तयांचे १०. बालग्राम प्रार्थना ११.  इंद्रजीत १२. शाळा १३. शिक्षका तू वेडा कुंभार  १४. माय मराठी १५. कविता १६. बाप १७. असावे असे माझे गांव. १८.  'सजा-ए -मौत' १९. . गांव विकताना पाहिला २०. . भ्रष्टाचार. २१. कामगार. २२. 'अजून अशा किती निर्भया..?' २३. ऑनर किलिंग. न्याय मिळालाच पाहिजे. २४. भूक २५.  learn or not to learn .. २६. आम्ही सारे भारतीय  २७. माझा शेतकरी बाप २८. .पीक २९. . धरित्रीचा बाळ. ३०. .  पान्हा आटला. ३१.  माझ्या कोकणी माहेरा... ३२. . तिचं अस्तित्व.. ३३. .  हुंडाबळी... ३४. जन्म लेकीचा ३५. पोरी ३६. आईची आई ३७. माई ३८. नारी ३९. स्कार्फ ४०. तू ४१. तिन्हींसांजेचे सुख ४२. तुझ्या डोळ्यांतील निज ४३. माझे हरवलेपण ४४. रुसवा ४५. मी ४६. माणूस म्हणून ४७. अश्रू ४८. बाजार फार झाला ४९. बासरी ५०. भूक ५१. स्वप्नही.. ५२. स्वप्नांचा चुराडा ५३. बाळ...माफ कर ५४. मी ५५. जगणं स्वतःसाठी ५६. करार ५७. मोरपीस ५८. हो विश्वात्मक ५९. वरद ६०. ती...

कोणता झेंडा घेऊ हाती. ?

 कोणता झेंडा घेऊ हाती. ?                                 देशाच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात झेंड्याला अनन्यसाधारण महत्व आहे.विशेषतः महाराष्ट्रात शेकडो वर्षांपूर्वी ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायाची मेढ रोवली.. आणि भगवी पताका खांद्यावर घेऊन अवघ्या वारकऱ्यांची मांदियाळी एकत्रित आणिली...शेकडो वर्षे खांदेपालट करून आजही वारकऱ्यांच्या खांद्यावरून ही भगवी पताका डौलाने पंढरपूरला जाते..म्हणजे आजही या वारकऱ्यांना एकत्रित गुंफण्याचं काम या भगव्याने केले आहे. मंदिरांच्या कळसावर असो अथवा वारकऱ्यांच्या खांद्यावर असो या भगव्या झेंड्याच्या मुळाशी अध्यात्माचा पाया रचला गेलेला आहे. या महाराष्ट्रात एकीकडे अध्यात्म आणि दुसरीकडे स्वराज्य हे दोन प्रवाह भगव्या झेंड्याच्या निशाणीने कालोघात प्रवाहित होत राहीले.                झेंडा म्हणजे एकेकाळी आपल्या अस्मितेचं,निष्ठेचं आणि समर्पणाचं प्रतिक होतं.धगधगत्या तेजस्वी ओजस्वी कर्तृत्वाचा ताठ बाणा म्हणजे झेंडा..उंच आस्मानी भिर...

श्वावत विकासासाठी मुलभूत विज्ञान आव्हाने आणि शक्यता. - किरण सुभाष चव्हाण.

इमेज
श्वावत विकासासाठी मुलभूत विज्ञान आव्हाने आणि शक्यता.          आज २१ व्या शतकाकडे वाटचाल करताना अशी कोणतीही गोष्ट नाही की, ज्याला विज्ञानाचा स्पर्श नाही. ज्ञानाला संशोधनाची जोड देऊन अजोड कार्य करण्याची क्षमता ठेवते ते विज्ञान. सर्वच क्षेत्रातील विज्ञानाचे अस्तित्व अनन्यसाधारण आहे. विज्ञानाने विकासाची उद्दिष्टे सफल होत असताना मानवी जीवनात सर्व प्रकारची समृद्धता आणि संपन्नता आणली.पण विकास ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे त्यामुळे वेळोवेळी त्या विकासात सुधारणांना वाव असतो.विकास करताना कोणता विकास आपल्याला हवा आहे ? आणि त्यासाठी काय करावे लागेल ? याचा विचार होणे महत्वाचे आहे. विकास साधत असताना तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कोणत्याही प्रकारच्या अविकासाच्या बाधा न आणता तो विकास संक्रमित झाला पाहिजे. म्हणजेच तो श्वावत विकास होय. जागतिक पर्यावरण व विकास आयोगाने १९८७ मध्ये श्वावत विकासाची व्याख्या अशी केली आहे की, " विकास ज्याने विद्यमान पिढीच्या गरजा पूर्ण होतात आणि त्यासाठी पुढील पिढ्यांच्या कौशल्यांशी तडजोड न करता त्यांच्याही गरजा पूर्ण करता येतील " याचाच अर्थ नैसर्गिक...